
शिरूर ताजबंद येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
*शिरूर ताजबंद येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.*
शिवाजी श्रीमंगले, शिरूर ताजबंद प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करत मानवाला अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज भैया पाटील, भाजपा अहमदपूर तालुकाध्यक्ष प्रा. प्रताप पाटील, प्रा.द मा माने, ग्रामपंचायत शिक्षण सभापती किसन कापसे, ग्रा. प.सदस्य रणधीर पाटील, शिवसेना नेते अनिल लामतुरे, ग्रामपंचायत सदस्या श्यामाबाई सरवदे, पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे, माजी व्हाईस चेअरमन गोविंद कापसे, कृ. बा. स. माजी संचालक नामदेव विराळे, मुख्यध्यापक दिपक भराटे, मुख्याध्यपक येरमे, मुख्याध्यापक बबलू शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामवाड, माजी सभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक सरवदे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बुद्धभुषण मोरे, उपाध्यक्ष विकी सरवदे, सचिव राजेश सरवदे, मार्गदर्शक माधव सरवदे, बळीराम मोरे, धर्मपाल सरवदे, मारोती सरवदे, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले, पत्रकार बालाजी पडोळे यांच्यासह भीमा अनुयायी, बोध उपासक - उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिती होते.