
जुलै पर्यंत शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होईल - शरदचंद्र धारूरकर ,
बोईसर ता. १३ - पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने पालघर जिल्ह्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांचे चर्चासत्र सायली रिसोर्ट, बोईसर येथे आयोजित केले होते. या चर्चासत्राला २३० शिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ मुंबई विभाग संपर्कप्रमुख पदी प्रमोद यांची निवड तसेच पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी प्रमोद पाटील तर सचिव पदी आशिष पाटील यांची निवड चर्चासत्रात शासनमान्य असलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी केली.
या चर्चासत्रासाठी पालघर चे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते नव्याने निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देण्यात आले. याप्रसंगी पालघर चे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भागडे, भाजपाचे जेष्ठ नेते संजय पाटील, अशोक वडे, पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा अधिकारी गिरीश इर्नाक, बोईसर चे सरपंच आनंद सोमण, उपसरपंच अर्चना पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर, ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप ढमाले , संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते समीर परब आदी मान्यवर व पालघर जिल्ह्यातील २३० क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण असून जिल्ह्यातील अनेक खेळाडूंमध्ये चांगली क्षमता आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच क्रीडा चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, या क्षेत्रातील असलेल्या समस्या सोडवण्यासाठी पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ काम करेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. लवकरच प्रत्येक तालुक्याची क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणी जाहीर केली जाईल असे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी, राज्य महासंघ १९८० पासून कार्यरत असून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आज पर्यंत महासंघाने अनेक असे यशस्वी लढे देऊन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या समस्या दूर केल्या आहेत. नव्याने पालघर जिल्हा राज्याशी संलग्न झाल्याने काम करण्यास अधिक बळ मिळेल अशी आशा व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
चौकटीत...
१)श्री. प्रमोद भालचंद्र पाटील- अध्यक्ष
२)श्री . अरविंद कृष्णा ठाकरे - कार्याध्यक्ष
३)श्री. पुरुषोत्तम दिवाकर पळसुले - उपाध्यक्ष
४)श्री. संजय नारायण पाटील - उपाध्यक्ष
५)श्री. प्रशांत नारायण पारगावकर - उपाध्यक्ष
६)सौ. अरुणा हर्षद सावे - उपाध्यक्षा
७)श्री. आशिष नरोत्तम पाटील- सचिव
८)श्री. योगेश किशोर चौधरी- खजिनदार
९) सौ. मनीषा दिनेश तारवी-- सहसचिव
१०)श्री. निलेश आत्माराम गायकवाड- सहसचिव
११)श्री. किरण बाळू पवार -सहसचिव
१२)सौ. रुचिता दर्पण ठाकूर- महिला आघाडी प्रमुख
१३)श्री. मारुती ज्ञानू थोरात - कार्यालयीन सचिव
१४)श्री. नरेंद्र रामचंद्र घरत - संघटक
१५)श्री. संजय सखाराम कीणी -सदस्य
१६)श्री. जयेश वासुदेव वैती- सदस्य
१७)श्री. रमाकांत वामन घरत - सदस्य