कळंबोली पनवेल येथे महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठ्या थाटात साजरा.
कळंबोली शहरातील साईनगर सोसायटी मध्ये महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक करून साजरा करण्यात आला. साईनगर सोसायटी ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रपवार गट नगरसेवक श्री सतीश पाटील साहेब व आदी मान्यवरांनी उपस्थित राहून बाबा साहेबांना मानवंदना दिली. लेझीम, ढोल तश्याच्या गजरात संपूर्ण वातावरण भीममय व नीलमय करून उत्कृष्ठ रित्या साजरा करण्यात आला.