logo

विश्वरत्न.महामानव डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त महात्मा फुले लिखित गुलामगिरी या ग्रंथाचे वाटप

शिंदखेडा-१४/०४/२०२५. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त शिंदखेडा शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती मार्फत महात्मा ज्योतिबा फुले यांचे लिखित ग्रंथ गुलामगिरी या ग्रंथाचे वाटप विद्यार्थी यांना करण्यात आले. सदर ग्रंथ वाटप करण्याचे उद्दिष्ट असे होते की महापुरुष यांचे विचार बहुजन समाज पर्यंत पोहचणे जरुरी आहे. महापुरुष यांची जयंती फक्त नाचून नाही तर 365 दिवस वाचून देखील साजरी होण्यासाठी महापुरुष यांचे लिखित ग्रंथ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी देशात महापुरुष यांचे विचारांचे प्रचार प्रसार होणे जरुरी आहे.11 एप्रिल रोजी देखील राष्ट्पीता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त गुलामगिरी ग्रंथाचे वाटप करण्यात आले होते.14 एप्रिल रोजी इतर मागासवर्गीय वस्तीगृह येथे देखील श्रीखंड वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संकल्पना अँड.चंद्रकात रोहिदास बैसाने. मा. प्रा.सारनाथ युवराज बोरसे यांची होती. सदर कार्यक्रम चे आयोजक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष मा. अभिमन पाटोळे उपाध्यक्ष मा. बन्सीलाल बोरसे. प्रा. निरंजन वेंदे. प्रा. मधुकर मंगले. मा.न्हानभाऊ पाटोळे . मा.प्रा.सारनाथ युवराज बोरसे. अँड.रितेश महिरे.अँड.चंद्रकात बैसाने. मा.संजयभाऊ पाटोळे मा. संजय धिवरे सर . मा.रावसाहेब बैसाने सर. मा.आर एन पवार सर. मा.पानपाटील. 134 वी जयंतीचे अध्यक्ष मा.पप्पू अहिरे. मा.अक्षय पाटोळे.महेंद्र बैसाने. प्रविण बैसाने व इतर पदाधिकारी बाबा ग्रुप अध्यक्ष. मिलिंद पाटोळे. व मा.मनोज भाऊ वानखेडे. इतर पदाधिकारी यांनी सदर परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिंदखेडा तालुक्याचे पोलिस निरीक्षक मा.बाळासाहेब थोरात साहेब शिंदखेडा नगरपंचायत प्रशासक पंकज पवार साहेब शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकांत फागणेकर साहेब.प्रशासन अधिकारी सचिन वाघ साहेब.सहायक पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड साहेब. सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार साहेब व त्यांचे सहकारी यांची उपस्थिती होती.

21
1048 views