बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी!!
मन्सूर. शहा.:--आज सकाळी.बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी.अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, त्यामुळे बस आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे (चक्काचूर) झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला आणि विटा गवतात पसरल्या होत्या.
जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तात्काळ खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.