
तीन हजार रूपयांची लाच घेत असतांना महसुल कर्मचार्याला अटक
*"यशस्वी सापळा कारवाई अहवाल "*
▶️ *घटक :- भंडारा
▶️ *गुन्हा रजि.नं.*:- *भ्र.प्र.अधि.1988 (संशोधन 2018) चे कलम 7 अन्वये प्रक्रिया सुरू.
▶️ *तक्रारदार* :- पुरुष वय ५२ वर्ष,
▶️ *आरोपी लो.सेवक* :- श्री सुनील होमराज लोहारे वय ४५ वर्ष पद - सहाय्यक महसूल अधिकारी, वर्ग-3, नेमणूक- तहसील कार्यालय, भंडारा प्रतिनियुक्ती उपविभागीय कार्यालय,भंडारा,रा. शिव मंदिर जवळ गजानन नगर बहादूर फाटा उमरेड रोड नागपूर.
▶️ *तक्रार प्राप्त*
दिनांक:- 09/04/2025
▶️ *पडताळणी* दिनांक :-11/04/2025
▶️ *सापळा* :-
दिनांक 15/04/2025
▶️ **लाच मागणी:-* एकूण 3000/- रुपयाची मागणी.
▶️ **लाच स्वीकारली* दिनांक 15/4/2025 रोजी 3000/- रुपये.
▶️ *घटनास्थळ*:- आलोसे यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय,ता जि. भंडारा.
▶️.*हकीकत* :- यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे मौजा केसलवाडा, तालुका, जिल्हा भंडारा येथे प्लॉट असून त्यातील काही क्षेत्रफळाच्या प्लॉटची सन 2017 मध्ये विक्री करण्यात आली होती. सदर वेळी चुकीमुळे तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव सातबारा वरून कमी करण्यात आले व अन्य व्यक्तीचे नाव सातबारावर चढविण्यात आले. सातबारा वर चुकीने नाव वगळण्यात आल्यामुळे तक्रार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाची नोंद सातबारावर होण्याकरिता दिनांक 24/2/25 रोजी तलाठी कार्यालय, केसलवाडा येथे अर्ज दिला होता. सदर अर्ज पुढील कार्यवाही करिता तलाठी कार्यालय केसलवाडा येथून उपविभागीय कार्यालय, तालुका भंडारा जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आला आहे. सदर अर्जावर दुरुस्ती संदर्भातील आदेश घेऊन सातबाऱ्यावर योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांना तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. दिनांक ११/४/२५ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी यांनी ३०००/- रुपये ची मागणी पंचा समक्ष केल्याचे निष्पन्न झाले.
आज रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी आलोसे श्री सुनील हेमराज लोहारे यांनी पंचा समक्ष, स्वतःचे कार्यालयात तक्रारदार यांचेकडून ३०००/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन भंडारा येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *आरोपीतांची घरझडती* :-घरझडती कार्यवाही सुरु आहे.
▶️ आलोसे यांचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
▶️ मार्गदर्शन :
1) मा. डॉ. श्री दिगंबर प्रधान ,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
2)मा. श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.*
3) मा. श्री संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नागपूर
▶️ *सापळा व तपास अधिकारी*
मयूर चौरसिया, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. भंडारा *मो. क्रं 98239 66830*
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*:-
डॉ अरुणकुमार लोहार,
पोलीस उपधीक्षक *मोबाईल क्र 9870376706*
▶️ *कारवाई पथक*
पो हवा *मिथुन चांदेवार*, पो हवा. *अतुल मेश्राम*, पो शि *विष्णू वरठी*, *पो. ना. नरेंद्र लाखडे*
▶️ *हैश वैल्यू घेण्यात आली आहे.*
▶️ **आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. जिल्हाधिकारी, भंडारा.
* =============
भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची/लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.*
1) *डाॅ.श्री दिगंबर प्रधान, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923185566*
2) *श्री*. *सचिन कदम*, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.*
3) *श्री* *संजय पुरंदरे* अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र वी नागपूर
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
=================