किनवट अर्बन निधी बँक लिमिटेड शाखा मांडवीच्या वतीने भिम जयंती उत्सहात साजरी.
किनवट - मांडवी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अर्बन निधी बँक मांडवी येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असणारे भारत राठोड,कीर्तिराज देटे,यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. लगेच बँकेचे संचालक विजय मगरे पाटील यांच्याकडून पंचशील व धम्मवंदना करण्यात आली. बुद्ध अनुयायीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले या वेळी प्रणय कोवे, सुरेश कोटुरवार, विशाल दासरवार,हर्षल शेंडे, शिवम चव्हाण,गौतम वाघमारे, तथागत सूर्यवंशी, दिक्षा वाघमारे, श्रुती सोनुले, सूत्रसंचालन हर्षल शेंडे व आभार बँकेचे संचालक विजय मगरे पाटील यांनी मानले.