चिखली तालुक्यातील ९९ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; राजकीयदृष्ट्या महत्वाची गावे खुल्या प्रवर्गासाठी .!!
चिखली(मन्सूर शहा ):– तालुक्यातील ९९ गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज (दि.१६) चिखली तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नायब तहसीलदार खाडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या सोडतीत राजकीयदृष्ट्या महत्वाची असणारी बहुतांश गावे ही खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने सरपंचपदासाठी फिल्डिंग लावून बसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेरा बुद्रूक, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, देऊळगाव धनगर, इसरूळ, आंचरवाडी, डोंगरशेवली यासारख्या महत्वाच्या गावांच्या सरपंचांचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव सुटले असून, सवणा, मेरा खुर्द नागरिकांचा मागासप्रवर्ग तर अंत्री खेडेकर, साकेगाव, गांगलगाव, गुंजाळा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुटले आहे. सन २०२५ ते सन २०३० या कालावधीकरिता हे आरक्षण काढण्यात आलेले आहे. दरम्यान, यातील महिलांचे आरक्षण दि.25 एप्रिलरोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढले जाणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेकांना आता सरपंचपदाचे डोहाळे लागणार आहेत.या आरक्षण सोडतीमुळे अनेक गावांत राजकीय कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरले असून, त्यांच्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. आज तहसीलदारांच्या उपस्थितीत निघालेले सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. आंचरवाडी-वसंतनगर (सर्वसाधारण), अंत्री खेडेकर (अनुसूचित जाती), अंबाशी (सर्वसाधारण), अमडापूर (ना.मा.प्र.), अमोना (सर्वसाधारण), असोला बुद्रूक (सर्वसाधारण), अंत्री कोळी (सर्वसाधारण), आंधई (सर्वसाधारण), आमखेड (ना.मा.प्र.), इसरुळ (सर्वसाधारण), इसोली (ना.मा.प्र.) उत्रादा (सर्वसाधारण), उदयनगर (ना.मा.प्र.), एकलारा (सर्वसाधारण), करणखेड (अ.जा.), करतवाडी (सर्वसाधारण), करवंड (सर्वसाधारण), कवठळ (अ.जा.), कव्हळा (सर्वसाधारण), काटोडा (ना.मा.प्र.), किन्ही सवडद (ना.मा.प्र.), किन्हीनाईक (ना.मा.प्र.), किन्होळा (सर्वसाधारण), केळवद (अ.ज.), कोनड खुर्द (अ.जा.), कोलारा (सर्वसाधारण), खंडाळा मकरध्वज (सर्वसाधारण), खैरव (सर्वसाधारण), खोर (अ.जा.), गांगलगांव (अ.जा.), गुंजाळा (अ.जा.), गोदरी (सर्वसाधारण), चंदनपूर (अ.जा.), चांधई (ना.मा.प्र.), टाकरखेड मु (सर्वसाधारण), टाकरखेड हेलगा (अ.ज.) डासाळा ( ...डासाळा (सर्वसाधारण), डोंगरगाव (ना.मा.प्र.), डोंगरशेवली (सर्वसाधारण), तेल्हारा (ना.मा.प्र.), तोरणवाडा (सर्वसाधारण), दहिगांव (सर्वसाधारण), दिवठाणा (अ.ज.), देऊळगाव धनगर-पिंपळवाडी (सर्वसाधारण), धानोरी (अ.जा.), धोडप (सर्वसाधारण), धोत्रा नाईक (ना.मा.प्र.), धोत्रा भनगोजी (ना.मा.प्र.), नायगांव बुद्रूक (अ.जा.), नायगाव खुर्द (अ.जा.), पळसखेड दौलत (ना.मा.प्र.), पांढरदेव (अ.जा.), पाटोदा (अ.जा.), पिंपरखेड प्र-अमडापुर (सर्वसाधारण), पेठ (सर्वसाधारण), बेराळा (सर्वसाधारण), बोरगांव काकडे (सर्वसाधारण), बोरगांव वसु (अ.जा.), ब्रम्हपुरी (अ.जा.), भरोसा (सर्वसाधारण), भानखेड (ना.मा.प्र.), भालगांव (सर्वसाधारण), भोकर (सर्वसाधारण), भोगावती /तांबुलवाडी (सर्वसाधारण), भोरसा भोरसी (सर्वसाधारण), मंगरुळ (इ) (सर्वसाधारण), मंगरूळ नवघरे (ना.मा.प्र.), मनुबाई (सर्वसाधारण), मलगी (ना.मा.प्र.), महिमळ (सर्वसाधारण), मालगणी (अ.जा.), माळशेंबा (सर्वसाधारण), मिसाळवाडी (सर्वसाधारण), मुंगसरी (ना.मा.प्र.), मुरादपुर (सर्वसाधारण), मेरा खुर्द (ना.मा.प्र.), मेरा बुद्रूक (सर्वसाधारण), मोहदरी (सर्वसाधारण), येवता (अ.जा.), रानअंत्री (अ.जा.), रोहडा (स(सर्वसाधारण), येवता (अ.जा.), रानअंत्री (अ.जा.), रोहडा (सर्वसाधारण), वरखेड (अ.जा.), वळती (सर्वसाधारण), वैरागड (ना.मा.प्र.), शिंदी हराळी (सर्वसाधारण), शेळगांव आटोळ (सर्वसाधारण), शेलगांव जहांगीर (सर्वसाधारण), शेलसूर (सर्वसाधारण), शेलूद (ना.मा.प्र.), शेलोडी (ना.मा.प्र.), सवणा (ना.मा.प्र.), साकेगांव (अ.जा.), सातगांव भुसारी (सर्वसाधारण), सावंगी गवळी (सर्वसाधारण), सावरगांव डुकरे (ना.मा.प्र.), सोनेवाडी (ना.मा.प्र.), सोमठाणा (ना.मा.प्र.), हरणी (ना.मा.प्र.), हातणी (अ.जा.). आरक्षण सोडतप्रसंगी तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नायब तहसीलदार खाडे यांच्यासह निवडणूक अधिकारी कडू, मुख्य लिपीक काकडे यांची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली, तर तहसील कार्यालयात बहुसंख्य गावांच्या सरपंच, सदस्यांसह राजकीय कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.