
सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू . . . .
विषारी सर्पदंशाने कै . वै . ह . भ . प . गोपाळ मालु भोईर वय वर्षे ६८ यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील , ता . शहापूर मधील टेंभरे (शेंद्रूण ) येथे झाला.
यांना सरीसृप वर्गातील विषारी प्रजातीच्या घोणस ( Russell Viper ) सापाच्या दंशाने मृत्यू झाला .
ही दुर्दैवी घटना मंगळवार , दि . २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ : ०० वाजता घडली . आणि रविवार , ०२ मार्च २०२५ मंगळवार रोजी कै . वै . ह . भ . प . गोपाळ मालु भोईर असे या मृत्यू झाला.
सोबत घरा जवळील शेतातून काम करुन घरी येत असताना सरीसृप वर्गातील विशेष करुन विषारी प्रजातीच्या घोणस या सापाने कै . वै . ह . भ . प . गोपाळ मालु भोईर यांच्या डाव्या पायाला दंश केला .
सदरची घटनेची घटनास्थळी माहिती मिळताच यांचा मुलगा आणि पुतण्या हरेश गोपाळ भोईर यांनी वै . ह . भ . प . गोपाळ मालु भोईर यांना टेभंरे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .
परंतु सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने बाधित रुग्णाला पुढील उपचारासाठी शहापूर प्राथमिक केंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी उपचारा दरम्यान उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांची प्रकृती जास्त चिंताजनक झाली.
त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे असा सल्ला दिला.
म्हणून त्यांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले . परंतु रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रविवार , ०२ मार्च २०२५ रोजी दुपारी १३ : ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली .
या निधनाबद्दल गावावर शोककळा पसरली . अनेकांनी या आकस्मिक दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे .
भारतात मध्ये दहा लाख जनतेला सर्पदंश होतात . तर जवळपास ५०,०००० जनता सर्पदंशाने बळी पडतात हे जागतिक स्तरावर अंदाजे सर्पदंशापासून मृत्यूंपैकी एक तृतीयांश आहे . त्याचप्रमाणे एड्स मुळे बळी पडणाऱ्या प्रत्येक दोन लोकांमागे एक सर्पदंशाने बळी असतो .
सदर कै . वै . ह . भ . प . गोपाळ मालु भोईर त्यांच्या पश्चात ३ भाऊ, २ मुलं,१ मुलगी, पुतण्या असा परीवार आहे.
सदर निसर्ग विज्ञान संस्थाच्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र या नात्याने कार्यकर्ते श्री . प्रवीण भास्कर भालेराव , श्री . उत्तम बांगर आणि श्री . वैभव पद्माकर कुलकर्णी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली .
https://youtu.be/QIFqNa7BEbo?si=9Lz8rqgL7s3_nVSe
निसर्ग विज्ञान संस्था,डोंबिवली