
घटस्फोट....
*घटस्फोट*
लग्नाला सहाच महिने झाले.दिवाळीत नवऱ्याने बायकोला साडी घ्यायला रु.3000/- दिले पण बायकोला 10,000/- चीच साडी घ्यायची होती.
नवऱ्याने सांगितले पुढच्यावेळी घेऊ दहा हजाराची साडी आत्ता पैसे कमी आहेत एव्हढ्या पैशात चांगली साडी येईल पण बायकोच ती बसली हट्ट करून.लावला आईला फोन आणि सांगितलं "मला दहा हजाराची साडी घ्यायची आहे पण नवऱ्याने तीनच हजार दिले."
आईने लेकीला "फोन जावयाकडे दे" म्हणून सांगितले हिनं फोन नवऱ्या कडे दिला तसं सासुने जावयाला झापलं "तुमची लायकी नाही माझ्या लेकीला दहा हजाराची साडी घ्यायची" बिचाऱ्या जावयाने सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकुन कोण घेईल.फोन बंद झाला आणि आईने लाडक्या लेकीच्या अकाऊंटवर दहा हजार पाठवले. हळुहळु असेच छोटे छोटे वाद मग मोठ्या मोठ्या भांडणात त्याचं रुपांतर झालं आणि भांडणं "कोर्टात"गेलं ते आजही चालूच आहे.
ही सत्य घटना आहे. जिथं एका आईच्या चुकीच्या पाठींब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहुन कायमची माहेरी आली.
मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा?
इतकाच लेकिचा पुळका होता,प्रेम होतं तर
*एखादा घरजावयी शोधायचा सासुच्या तालावर नाचणारा.*
२७/२८ वर्षांपूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती आज तीच मुलीच्या संसारात नाक तोंड खुपसते.
आईचं मुलीच्या संसाराची राख करताना दिसत आहे.
अशा बायकांनी स्वतःचा भुतकाळ आठवावा.
आपल्यावेळी काय,कसे दिवस होते जिथं सासु सासरे दिर नणंद यांच्यासमोर बोलायची हिम्मत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाली.
खरंतर हल्लीच्या मुलींनासुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागली.
ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही.
आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजाऊन सांगणं.
नाही की तीच्या संसारात दखल देणं.
*मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला लेक सासरी राहिल?*
मुलगी सासर सोडुन माहेरी रहाण्यात कसला मोठेपणा वाटतो?
वाद मिटवताना चार पाहुण्यात जर बाप स्वतःच तोंड झोडुन घेत असेल तर विचार करा सासरहुन माहेरी आलेल्या मुलीला क्षणाक्षणाला समोर बघुन काय वाटत असेल त्या बापाला?
सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते.
*हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहिस चित्र दिसतंय.*
आज सासर सोडुन माहेरी आलेल्या मुलीचं भलेही ऊद्या दुसरं लग्न लावून द्याल पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर पश्चात्तापच होणार... कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो.
आज तीन हजाराची साडी घेणारा ऊद्या तुला हौसेने दहा हजाराची साडी न मागता घेईल.
तु फक्त संयम ठेव.
हेच जर,
तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ऍडजस्ट " करुनच रहावं लागेल.
*भांडणं कीतीही करा पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको.*
शाब्दिक चकमकीचं युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नेऊ नको.
सासरची गाऱ्हाणी माहेरच्या ऊंबऱ्यात नेऊ नको.
संसार करताना कीतीही भांडणं होऊ द्या,
पण
ती फक्त दोघातच ठेवा.
गोडीत असताना अशा विषयांवर बोलत चला.
गोडीगोडीत एकमेकांच काय चुकलं ते बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात.
म्हणूनच वाद विकोपाला जातात.
ह्याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात.
दोघांमधील बाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकाने तरी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे.
समजून घेतलं पाहिजे.
तरच संसार सुखाचा होईल.
हे स्वानुभवाचे बोल आहेत.
जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील...
बरेचसे संसार वाचतील....
एक आम्ही होतो गळ्यातले काळे मणी आणि दोन फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसाराचं आभाळभर आनंद ऊपभोगणारे.
कपाळावरच्या कुंकवाला बघुन नवऱ्याला दीर्घायुष्य लाभाव म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता.
दोन वेळेचं पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं.
आणि आता....
बंगला,गाडी गडगंज मालमत्ता असुनही आम्ही सुखी,समाधानी नाही.
हल्लीच्या मुली... यांच्या अपेक्षाच संपत नाही... परिणाम... *घटस्फोट*...
मुलिंच्या आईंनो तुम्हाला विचारावं वाटतं...
तुमच्या संसारात तुमच्या पण आईवडिलांनी अशी कधी लुडबुड केली का? मुळीच नाही.
पुर्वी ईतका छळ, मारहाण व्हायची तरी सुद्धा आईवडील समंजसपणे चार पाहुणेरावळे गोळा करून वाद मिटवत असे.कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धिला कधी पटलंच नाही. वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला दोन दिवसांत सासरी नेऊन सोडायचे. "मेलेली आणुन सोडली जिवंत विचारायला येईन" हे वाक्य किती जणांना माहीत आहे?
राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली.सासुसारऱ्यांना मारहाण,नवऱ्याला छळणाऱ्या,त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या , क्षणाक्षणाला कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना,बायकांना खरंच धाक राहिलाच नाही....
तेव्हा,
भानावर या... लक्षात ठेवा...
पहिली बायको,पहिला नवरा.पहिला तो पहिलाच असतो दुसऱ्यांदा असते ती फक्त "तडजोड" आयुष्यभराची... मरेपर्यंत..
*विचार करा घटस्फोट वाचवा* 🙏🌹