टाटा सुमो गाड़ी चा अपघात एक महिला मृत
साखळी येथे सुमो वाहनाचा भीषण अपघात – एका महिलेचा मृत्यू, चालक गंभीर जखमीतुमसर तालुका – 18 एप्रिल, शुक्रवार: मिटेवानी येथून बघेडा येथे मामा च्या मुलिच्या लग्नासाठी निघालेल्या टाटा सुमो वाहनाचा साखळी गावाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत संगीता लक्ष्मिकांत सलामे (वय 42)यांचा जागीच मृत्यू झाला असून वाहन चालक व मालक उमेश मरसकोल्हे गंभीर जखमी झाला आहे.अपघातग्रस्त वाहनामध्ये दोन बहिणी, भाऊ, त्याची पत्नी, मावशी व तीन लहान मुले असे एकूण आठ प्रवासी होते. हे सर्वजण मिटेवानी येथून बघेडा येथे मामाकडे विवाह समारंभासाठी निघाले होते. साखळी गावाजवळ आल्यानंतर टाटा सुमो वाहनाचा ताबा सुटल्याने ते उलटले.या अपघातात माजी नगरसेवक लक्ष्मिकांत सलामे यांची पत्नी संगीता सलामे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. वाहन चालक उमेश मरसकोल्हे याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचार सुरू आहेत. इतर सहा प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.यात तिन बालकांचा समावेश आहे