
चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे आयुक्तांना पत्र
पिंपरी चिंचवड : उचिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे आयुक्तांना पत्र उ न्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पिंपरी चिंचवड शहरात अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने महापालिका आरोग्य, पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे. दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यामुळे परिसरात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढू नये याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने अशुद्ध, दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असलेल्या तक्रारींबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत फेडरेशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महानगरपालिकेच्या सर्व भागात पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अतिशय अशुद्ध आणि घाण स्वरूपाचा आहे. या पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य वाटत नाही. या घाण आणि अशुद्ध पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे
पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या सूचना देऊन शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना करावा . नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील चार दिवसांमध्ये या दूषित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाही तर फेडरेशन मार्फत लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.. आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा पाणी पुरवठा अधिकारी याची दाखल घेत नाही व आम्हाला टँकर ने पाणी मागवावे लागते व ते पाणी सुद्धा दूषित असते त्यामुळे आमची दाखल घ्यावी ही शेवटची विनंती मागील पंधरा दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात अतिशय घाण स्वरूपाचा आणि उग्र असा वास येणारा पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा महानगरपालिकेकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर नियंत्रण दिसत नाही. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले, गरोदर महिला, आणि वयोवृद्ध नागरिक यांना पाण्याचा खूप त्रास होत आहे. पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा झाला नाही तर फेडरेशन मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात करून हेच आलेले घाण आणि अशुद्ध पाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पिण्यासाठी दिले जाईल.
ईश्वर वाघ