
बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेचा "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक ....!
बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेचा "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादित केला.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
पाचोरा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-२ तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा बक्षीस वितरण सन २०२४/२५ सोहळा व्यापारी भवन पाचोरा येथे संपन्न झाला. तसेच प्राथमिक शिक्षण विभागातून तालुक्यातील नीपाणे तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील पाचोरा येथील गो.से. हायस्कूल ह्या दोघेही शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस व बांबरुड राणिचे येथील जि,पर शाळे ने तृतीय क्रमांक मिळवले ह्या दोघेही शाळा व बांबरूड राणिचे येथील जि.प. शाळेचे माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील आहेत त्या प्रसंगी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दोघेही शाळेचे व जि,प,शाळच्या मुख्याध्यापक तसेच शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे तसेच शिक्षकांचा गौरव केला तसेच तालुका शिक्षण अधिकारी यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे असे सुचविण्यात आले .त्या प्रसंगी पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे, तालुका गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील , अधीक्षक शालेय पोषण आहार पाचोरा श्री.सरोज गायकवाड मॅडम, जेष्ठ नेते खलील दादा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील,बांबरूड राणिचे येथील शालेय शिक्षण समिति अध्यक्ष रामकृष्ण पाटील व सदस्य मनोज वाघ , शिक्षक सेनेचे राजेंद्र पाटील सर, विजय ठाकूर सर,तसेच मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.व बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेचे बक्षीस घेताना जि.प.शाळा बांबरुड राणिचे मुख्याध्यापक तथा सचिव
श्री भाऊसाहेब दशरथ पवार सर,
श्री सुभाष मोतीराम जगताप,
श्री प्रशांत पांडुरंग गवळी,
श्री सचिन कुमार सोनवणे,
श्रीमती रुपाली,
श्रीमती गायत्री जैन,
श्री किशोर महाजन,
श्री भटुकांत,
श्री ज्ञानेश्वर मनोज चौधरी ,
श्री प्रविण सोनकुळ,
श्री राकेश धायबर,
श्री महेश गंवादे,
शिक्षक खासदार श्री अनिल रामसिंग बेलदार आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.