
गजानन चायल यांची हिमायतनगर भाजपा तालुका अध्यक्षपदी पुन्हा फेर निवड...उत्कृष्ट कामाची निरीक्षकांनी घेतली दखल.....
गजानन चायल यांची हिमायतनगर भाजपा तालुका अध्यक्षपदी पुन्हा फेर निवड...उत्कृष्ट कामाची निरीक्षकांनी घेतली दखल.....
:- हिमायतनगर शहर
हिमायतनगर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष निवडीच्या हालचालीला मागील आठ दिवसांपासून मोठी हालचाल सुरू होती या हालचालीला आज दिनांक 20 एप्रिल रोजी अखेर पूर्णविराम मिळाला व अगोदरचेच तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्या उत्कृष्ट कामाची पक्ष निरीक्षकांनी दखल घेऊन त्यांना हिमायतनगर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढविण्यासाठी पुन्हा तालुका अध्यक्ष म्हणून संधी दिली त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे....
हिमायतनगर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून चंद्रशेखर पाटील व डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर यांची पक्षश्रेष्ठींनी निवड करून त्यांना पक्षाचे संघटन व सदस्य नोंदणी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सर्वे पक्ष कार्यालयाकडे पाठवून हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष अर्थात तालुकाध्यक्ष आणि हिमायतनगर शहर मंडल अध्यक्षपदी वर्णी कोणाची लागणार ? याची उत्सुकता लागली होती भाजपा पक्षश्रेष्ठीच्या बैठकीनंतर आज दि 20 एप्रिल रोजी प्रदेश कार्यालयाकडून आज तालुका मंडळ कार्यकारणी घोषित करण्यासाठी पक्षाने निवडलेल्या निरिक्षका कडून तालुका अध्यकांचे नाव जाहीर करण्यात आले त्यात हिमायतनगर तालुक्यातील मागील तीन वर्षा पासून पक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते व संघाच्या तालमीत वाढलेले देव देश धर्माची जान असणारे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांची पक्ष संघटनेने पुन्हा फेर निवड करून त्यांना पुन्हा ह्या मतदार संघात पक्ष वाढीची संधी दिली आहे भारतीय जनता पार्टीची ताकद तालुका अध्यक्ष गजानन चांयल यांनी मोठ्या प्रमाणात वाढविल्यामुळे आज दिनांक 20 एप्रिल रोजी हिमायतनगर मंडळ अध्यक्षपदी पुन्हा त्यांची फेरी निवड करून तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.....