logo

ब्रेकिंग न्यूज – ऑल इंडिया मीडिया असोसिएशन

ब्रेकिंग न्यूज – ऑल इंडिया मीडिया असोसिएशन
स्थान: सिद्धेश्वर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली

सिद्धेश्वर गावात नाली बांधकामाविषयी जागरूक नागरिकांचा आवाज – प्रशासनाला योग्य मार्गदर्शनाची गरज

सिद्धेश्वर गावात नुकतंच झालेलं नालीचं बांधकाम हे दर्जेदार असून गावासाठी महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. मात्र, सद्यस्थितीत नालीत पाण्याचा योग्य प्रकारे प्रवाह सुरू न झाल्यास हे बांधकाम लवकरच निष्प्रभ ठरू शकतं, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

गावाचे जागरूक नागरिक अब्दुल फारूक अब्दुल हादी यांनी माननीय सरपंच साहेबांना विनंती केली आहे की, संबंधित ठेकेदारास तातडीने निर्देश देण्यात यावेत की नालीच्या वर रिकामे पोते टाकण्यात यावेत, जेणेकरून नालीतून पाण्याचा प्रवाह योग्यरित्या सुरू होईल आणि हे बांधकाम अधिक टिकाऊ ठरेल.

हा एक छोटासा उपाय असून त्याद्वारे शासकीय निधीतून झालेल्या कामाचे संरक्षण होईल आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक उदाहरण निर्माण होईल.

सिद्धेश्वर येथून अब्दुल फारूक अब्दुल हादी यांचा विशेष रिपोर्ट – ऑल इंडिया मीडिया असोसिएशन

"निष्पक्ष पत्रकारिता, जनतेचा आवाज"

15
3108 views