logo

नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाचा यलो अलर्ट : उष्ण व दमट हवामानामुळे उष्माघाताचा धोका

नांदेड, दि. २२एप्रिल –
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई (भारत सरकार, पृथ्वी विज्ञान मंत्रालय) यांनी नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या अलर्टनुसार हवामान अत्यंत उष्ण व दमट राहण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना, तसेच वृद्ध, बालक आणि आजारी लोकांना अधिक त्रासदायक ठरू शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, उलटी, त्वचा कोरडी होणे आणि ताप जाणवणे ही उष्माघाताची संभाव्य लक्षणे असू शकतात.

हवामान विभागाने नागरिकांना पुढीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे :
• दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे
• पाणी व इतर द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत
• हलके, सैलसर आणि सूती कपडे वापरावेत
• शक्य असल्यास सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्यावी
• उघड्यावर काम करताना दर काही वेळाने विश्रांती घ्यावी

यलो अलर्ट म्हणजे हवामान स्थिती तितकीशी गंभीर नसली, तरी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले.

18
5479 views