
ढोराळा शाळेस मु का अ डॉ मैनाक घोष यांची भेट
जिल्हा प्रतिनिधी (विकास वाघ धाराशिव)
कळंब तालुक्यातील ढोराळा येथे नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला धाराशिव जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर मैनाक घोष साहेब शिक्षणाधिकारी प्रा अशोक पाटील साहेब,गटशिक्षणाधिकारी आदरणीय काळमाते साहेब, विस्तारधिकारी जंगम साहेब, माळी साहेब केंद्रप्रमुख मेनकुदळे सर यांनी अचानक भेट दिली, भेटीमध्ये त्यांनी शाळेतील खालील बाबींची सविस्तरपणे पाहणी केली.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी मधील ऱ्हाइम म्हणण्यास सांगितले मुलांनी कृतीयुक्त ऱ्हाइम सादर केली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील चंद्राच्या कला याबाबत माहिती विचारली, मुलांनी समाधानकारक उत्तरे दिली.
जायभाय सर यांनी इंट्रॅक्टिव्ह बोर्ड वापराची माहिती दिली
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन घेतले. विद्यार्थ्यांनी अस्खलितपणे वाचन करून वाचन करून , वाचलेल्या मजकुराचे मराठीत स्पष्टीकरण करून सांगितले. साहेबांनी समाधान व्यक्त केले
इयत्ता पहिली नव्याने प्रवेशित झालेल्या मुलींना गाणे सादर करण्यास सांगितले मुलींनी छान पैकी गाणी सादर केले.
जायभाय सरांनी शाळेचा विशेष उपक्रम म्हणून इंग्रजी शब्द संपत्ती स्पर्धा चा परिचय करून दिला व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना कोणताही शब्द विचारण्याची विनंती केली यावर सी ई ओ साहेबांनी पाठ्यपुस्तकातील दोन शब्द मुलांना विचारले, सर्व मुलांनी विचारलेल्या शब्दाचे स्पेलिंग व अर्थ सांगितले साहेबांनी खूप समाधान केले. व हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवावा अशी सूचना केली.
शिक्षणाधिकारी साहेबांनी सर्व मुलांना कूट प्रश्न विचारला
पांढरी गाय पांढरे दूध देते तर काळी गाय कोणत्या रंगाचे दूध देईल?
यावर सर्वच मुलांनी पांढरे हे उत्तर दिले.
गटशिक्षणाधिकारी साहेबांनी मुलांना संविधान म्हणण्यास येते का?
हा प्रश्न विचारला. यावर मुलांनी आम्हाला मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेमधून संविधान येते असे उत्तर दिले. साहेबांनी त्यांना मराठी मधून संविधान म्हणण्यास सांगितले सर्व मुलांनी एकत्रितपणे संविधान म्हणून दाखवले. साहेबांनी संविधानावर आधारित *लोकशाही व धर्मनिरपेक्षता* याबद्दल माहिती विचारली. मुलांनी समाधानकारक उत्तरे दिली.
केंद्रप्रमुख साहेबांनी जिल्हा परिषदेची खो-खो टीम अतिशय उत्तम असल्याचे साहेबांना सांगितले. जिल्हास्तरावरील बक्षीस मिळवले असल्याचे सांगितले साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक साहेबांनी लोकसहभाग व सी एस आर फंडामधून शाळेमध्ये फंक्शन हॉल, स्मार्ट बोर्ड व वाचनालय उभे केल्याबद्दल साहेबांना माहिती दिली याबद्दल साहेबांनी देखील खूप अभिनंदन केले.
शेवटी सर्व मुलांसोबत ग्रुप फोटो घेण्यात आला. शाळेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.