logo

वाठवडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांची भेट

जिल्हा प्रतिनिधी (विकास वाघ धाराशिव) कळंब तालुक्यातील वाठवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष साहेब,शिक्षण अधिकारी अशोक पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी काळमाते साहेब, विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम साहेब, विस्तार अधिकारी संतोष माळी साहेब, केंद्रप्रमुख मेनकुदळे साहेब, यांनी अचानकपणे शालेय गुणवत्ता तपासणीसाठी शाळेला आकस्मित भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर प्रत्यक्ष वर्गात जाऊन साहेबांनी स्वतः सर्व मुलांशी संवाद साधला. सर्वच वर्गातील गुणवत्ता पाहून शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन केले. शालेय उपक्रम पाहून त्याबद्दल सर्वच शिक्षकांचे साहेबांनी अभिनंदन केले.शालेय गुणवत्ता पाहून डॉ मैनाक घोष शिक्षण अधिकारी श्री अशोक पाटील साहेब व काळमाते साहेब यांनी समाधान व्यक्त केले. मुलांनी दाखवलेल्या इंग्रजी ऍक्टिव्हिटी पाहून सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक आम्हा सर्वांसाठीच आजचा दिवस अतिशय प्रेरणादायी ठरला. कारण उपस्थित सर्वच मान्यवरांचे अतिशय प्रेरणादायी असे बहुमोल मार्गदर्शन आज आम्हाला मिळाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शरद विश्वास पवार व अनेक शिक्षण प्रेमी नागरिक शाळेत उपस्थित होते. शालेय गुणवत्तेबद्दल गावातील उपस्थित नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.

54
4709 views