logo

कत्तलीकरिता विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने शेतात जनावरांना बांधून ठेवणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद 15 जनावराची सुटका

नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
सावनेर खापा :
मिळालेल्या माहितीनुसार:
पोलीस स्टेशन खापा दिनांक २१/०४/२०२५ रोजी रात्री खापा पोलीसांना माहिती मिळाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने वाकी शिवारातील सोपान धोटे यांच्या शेतात कत्तलीकरीता विकी करण्याचे उद्देशाने गोवंश जनावरे बांधुन ठेवली आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले असता सोपान धोटे यांच्या पिक नसलेल्या शेतात धुन्ऱ्यावर अंधारात झाडाझुडपामध्ये पोलीसांना १५ गोवंश जनावरे (बैल) दोरखंडाने बांधुन, चारापाण्याची व्यवस्था न करता मिळुन आले. तसेच जनावरांची सुरक्षा व देखभाल करीता कोणीही हजर मिळुन आले नाही. पोलीसांनी पंचनामा करून नमुद १५ गोवंश जनावरांना ताब्यात घेवुन जनावरांच्या सुरक्षा व देखभालीसाठी त्यांना राउळगाव येथील गोशाळेत दाखल केले.
सदर प्रकरणी अज्ञात आरोपी विरूद्ध पोलीस स्टेशन खापा येथे कलम ११ (१) (डी) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह कलम ५ (ए), ९ महा. प्राणी सुरक्षा अधिनियम कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

129
4258 views