ठाणे जिल्हयाच्या खेळाडूंची खेलो इंडिया युथ गेम्स साठी महाराष्ट्र रग्बी संघात निवड ,
ठाणे - ७ व्या खेलो इंडिया युथ गेम्स चे आयोजन ४ मे ते १५ मे २०२५ रोजी बिहार येथे होणार आहे. ह्या १८ वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम्स साठी ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन चे खेळाडू कु.आदिती पवार( विश्वास ज्यू कॉलेज,भाल) व कु.बिपीन शर्मा (बी. के.बिर्ला कॉलेज कल्याण) ह्यांची महाराष्ट्राच्या रग्बी संघात निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन चे अध्यक्ष श्री.निलेश भगत,सचिव प्रमोद पारसी, खजिनदार डॉ. यदनेश्वर बागराव ह्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेकरीत शुभेच्छा दिल्या.