शिंदी हराळी फाट्यानजीक अपघात
शिंदी हराळी फाट्यानजीक अपघात
18 वर्षीय युवकाचा मृत्यू
चिखली /सत्य कुटे :
चिखली तालुक्यातील शिंदी हराळी फाट्याजवळ दि. 23 एप्रिल 2025 रोजी रात्री 9.20 वाजता झालेल्या भीषण अपघातात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सोहम सतीश आदबाने (वय 18) हा अमडापूर येथे मोटारसायकल एचएफ डीलक्स एमएच-25-अ व्ही- 4113 वाहनाने प्रवास करत होता.
फिर्यादी अनिल पंढरी आदबाने (वय 35, राहणार अमडापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत सोहम यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सोहमचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दि.23 एप्रिल 2025 रोजी रात्री 9.20 वाजता घडली, तर घटनेची माहिती दि.24 एप्रिल 2025 रोजी पहाटे पोलिसांना देण्यात आली. तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल राजू सुसर प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञात वाहनचालकाविरोधात कलम 106 (1), 281, 125 (अ) बिएनएस आणि 134 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अधिक तपास पोलिस करीत आहे.