logo

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे वार्षिक आढावा बैठक उत्साहात संपन्न


पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा), दि. २४ एप्रिल २०२५ :

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित जनता प्राथमिक विद्यामंदिर, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे दिनांक २४ एप्रिल रोजी वार्षिक आढावा बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव प्रेमराजजी भाला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मंडळाचे संचालक सहदेवराव सुरडकर, अरविंदराव शिंगणे, अरुणभाऊ लाहोटी, डॉ. भुषणजी डागा, सुहासजी जामदार, अमोलजी खेकाळे यांची उपस्थिती लाभली होती.

विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मदनराव गवते, शेषरावभाऊ गायकवाड, साहेबराव गवते, भावसिंगजी सोळंके, संजयजी जोशी, आत्मारामजी कोरके, सुमंथाभाऊ पाटील, सदाशिवराव शिंदे, प्रभाकरराव तमळे यांचीही उपस्थिती यावेळी विशेष होती.

शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीच्या निरीक्षण समितीचे सदस्य सुभाषजी फटींग, शंकरराव भालेराव, रविंद्रजी बोंद्रे हेही बैठकीत सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व सरस्वती पूजनाने झाली. विद्यालयाच्या गीतगायन चमूने स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

विद्यालयाचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे यांनी प्रास्ताविक करत शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन देविदासजी दळवी सर यांनी केले.

मुख्य मार्गदर्शक प्रेमराजजी भाला यांनी "गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य कर्तव्य असून सर्व अध्यापकांनी ते प्रामाणिकपणे पार पाडावे," असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले.

अध्यक्षीय मनोगतातून रामकृष्णदादा शेटे यांनी "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी शिक्षकांनी नवतंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करावा. तसेच संस्कारक्षम पिढी घडविणे हे महान कार्य शिक्षकांनी जबाबदारीने पार पाडावे," असे स्पष्ट केले.

पर्यवेक्षक भगवान आरसोडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.

बैठकीनंतर सर्व मान्यवर व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

19
1696 views