logo

भारत पाकिस्तान युद्ध झाले तर चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील.

भारत अन् पाकिस्तान युद्ध झाले तर..?
भारताच्या बाजूने अनेक देश मात्र चीनचा पाकिस्तानला छुपा पाठिंबा का.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला आहे. यामागे चीनचा डाव असल्याचं बोललं जातं आहे.
पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत.
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं देखील थयथयाट करत काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला आहे. मात्र पाकच्या या निर्णयामागे चीनचा डाव असू शकतो का.? चीनने पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. त्यामुळे जर पाकिस्तानचं भारतासोबत युद्ध झालं तर चीन सामारिक दृष्या पाकिस्तानला मदत करू शकतो. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून भारतावर कुरघोडी करण्याची संधी आयतीच चीनला मिळणार आहे, आणि हेच सगळं गणित लक्षात घेऊन आता चायना आणि पाकिस्तान एकत्रितरित्या भारताविरुद्ध रणनीती आखू शकतात, याचाच एक भाग म्हणून शिमला कराराला एक प्रकारे रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानने त्या ठिकाणी घेतला असावा.
शिमला कराराच्या एका क्लॉज अनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे मुद्दे आहेत ते केवळ चर्चेच्या माध्यमातून आणि शांततेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी सोडवावेत, यामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाची किंवा पक्षाची मध्यस्थी असू नये, असं म्हटलं होतं. मात्र आता पाकिस्तानने हा करार रद्द केल्यास चायनाला आयती संधी मिळणार आहे. पश्चिमेकडून पाकिस्तान तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चीन भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतात, आणि त्यातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, हे सर्व गणित लक्षात घेऊनच पाकिस्तानने शिमला कराराला स्थगिती दिली आहे. यामुळे या प्रकरणात आता चायनाला एण्ट्री करणं सोपं होणार आहे.

14
649 views