logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलिस ठाण्याच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.


उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी इमारतीची सविस्तर पाहणी करत विविध कक्षांची माहिती घेतली. यामध्ये अधिकारी कक्ष, आवक-जावक बारनिशी, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, वायरलेस रूम, डे-बुक विभाग, मुद्देमाल कक्ष, तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, महिला-पुरुष विश्रांतीगृह, खेळाचे मैदान, बैठक कक्ष व प्रसाधन गृह यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहितीही देण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष मा.श्री. अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त मा.श्री. शेखर सिंह, पोलिस आयुक्त मा.श्री. विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त मा.श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त मा.श्री. स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मा.श्री. सचिन हिरे तसेच अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

116
11081 views

Comment