logo

पुणे: मागील ३ वर्षापासून फारार असलेल्या खूनाच्या प्रयत्नातील आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात...

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि नंबर १८९/२०२३. भा.द.वि. कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९,३२३.५०४,५०६ क्रिमीनल अमेटमेन्ट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) (३) आर्म अॅक्ट कलम ४(२५) या गुन्हयामध्ये मागील तीन वर्षापासुन फरार असलेला आरोपी युवराज सुदाम देवकाते, वय २० वर्षे, रा. सध्या होळकर वाडी, शंकर मंदीराजवळ, हांडेवाडी, पुणे मुळ रा. साळवे गार्डन, साईनगर, कोंढवा बु. पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अमलदार नितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे शोध घेत असताना पाहीजे आरोपी युवराज सुदाम देवकाते हा कान्हा हॉटेलच्या बाजुला थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेलजवळ जावून आरोपीचा शोच घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २५/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरगोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरयाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

81
17315 views