logo

जनता विद्यालयात बीजगोळे (Seed Balls) निर्मिती कार्यशाळा



शिक्षण प्रसारक मंडळ चिखली संचलित जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी बीजगोळे (Seed Balls) निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळाचा तीन लक्ष बीजगोळ्यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प या कार्यशाळेमुळे पुढे सरकला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे होते. कार्यशाळेच्या प्रारंभी बीज संकलनाच्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन सुहास कुळकर्णी यांनी केले. त्यानंतर विद्यालयाचे कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल निर्मितीचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

पर्यावरणविषयक जाणीव निर्माण व्हावी यासाठी गजानन पाटोळे यांनी पर्यावरणाचे महत्त्व, वृक्ष लागवडीचे फायदे व बीजगोळ्यांचा प्रभावी उपयोग या बाबतीत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व संचालन इको क्लबचे प्रमुख देविदास दळवी यांनी प्रभावीपणे केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. बीजगोळ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक समाजनिर्मितीचा संदेश या कार्यशाळेने दिला.
शेवटी प्रशांत देशमाने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांच्या सातत्याची गरज व्यक्त केली.

26
3830 views