
संपूर्ण महाराष्ट्राला देऊळगांवराजाच्या आई भवानीचे वेड
छोटी देवभुमी व धार्मिक वलय असणारी दे.राजा नगरी कुठल्या ना कुठल्या धार्मिक कारणासाठी पुर्वापार प्रसिध्द आहेच आणि त्यातल्या त्यात 21 साव्या आधुनिक युगामध्ये बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीच्या सिरपेचात मानाचा तुरा लावण्याच काम गुरुवर्य श्री मुंकुद आंधळे सर यांच्या आई भवानीने केले. याचे संयुक्तीक कारण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातुन आंधळे सरांचया आई भवानीला महिल-पुरुष अबाल वृध्द व काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली.
आई भवानीचा मिरवणुक सोहळा अलौकिक गर्दी आणि प्रचंड भक्तीमय वातावरणात आणि थाटामाटात पार पडला खरा. पण काही क्षण चित्रे स्थानिकांना व मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या जनतेच्या मनाला विचलीत करणारी होती ती म्हणजे एक वृध्द आणि अपंग महिला सुध्दा संपूर्ण गर्दींमध्ये संपूर्ण मिरवणुकीत सहभागी होती. सदर महिला व बाहेर गावावरुन आलेले भाविक व स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात काही चर्चा काणी पडत होती ती म्हणजे एवढया दुरवरुन तुम्ही आमच्या छोटयाश्या गावात तुम्ही काय येता बुआ? तर त्या ठिकाणी बरेच मंडळी आमचा नवस होता तर काही आमची आंधळे सरांवर खुप श्रध्दा आहे आमचा प्रण नवस पुर्ण झाला अश्या पध्दतीचे लोकांमधुन कुजबुज कानी पडत होती. नारी शक्तीचा मोठया प्रमाणात सहभाग पारंपारीक वाद्य, पारंपारीक पध्दतीने हातामध्ये देवीचा पोत घेऊन आनंदाने डौलताना भक्त या मिरवणुकीमध्ये दिसले.
शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम व नवसाला पावणारी आई भवानी म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री जगदंबा देवी फाउंडेशन आणि ट्रस्ट चे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु श्री मुंकुद आंधळे सर यांची आई भवानी प्रसिध्द आहे. सदर आई भवानी मिरवणुक सोहळा पलभट्टी देवी उत्सवाच्या एक दिवस अगोदर असतो.
आंधळे सर नेमके कोण?
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंधळे सरांचा आध्यात्मिक क्षेत्रातुन मोठा चालता वर्ग आहे. श्री जगदंबा देवी फांउडेशन ट्रस्टच्या माध्यमातुन पुर्णवेळ आध्यात्मिक कार्य जसे की, सनातन धर्माचा व आई जगदंबेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सुरु आहे. फांउडेशन च्या माध्यमातुन उपासना शिबीरा व भाविकांना मोफत अन्नछत्र, मुख्यत: आंधळे सर हे हजारो लोकांचे आध्यात्मिक गुरु असून त्यांचे श्री जगदंबा देवी संस्थान देऊळगांवराजा या YouTube चैनल ला दोन लाख सबस्क्रायबर आहेत.