logo

गुणवत्ता शिक्षणाचा प्रवास आणि कुटुंबातील प्रेरणादायी यश – नवलनगर पंडित नेहरू विद्यालयातील सेवापूर्ती सत्कार

गुणवत्ता शिक्षणाचा प्रवास आणि कुटुंबातील प्रेरणादायी यश – नवलनगर पंडित नेहरू विद्यालयातील सेवापूर्ती सत्कार


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय नवलनगरचे
एस एच पाटील यांचा नुकताच सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य श्री पी.सी ठाकरे होते. कार्यक्रमाची सुरुवात अगोदर सरस्वती प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पाठक सर यांनी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. एच पाटील यांच्या कार्यकाळातील केलेल्या कामाचा आढावा सांगितला. विचार पिठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. एच पाटील यांच्या सेवापूर्ती बद्दल प्रमुख अतिथी
प्रा. श्री गांगुर्डे सर, श्री सचिन जगन्नाथ बोरसे, सेवानिवृत्त शिक्षक श्री एन डी गोसावी सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री बी टी पाटील,सेवानिवृत्त प्राचार्य श्री संजय पाटील प्रा.श्री एस एन पाटील, क्रांतिवीर नवल भाऊ कॉलेजचे प्राचार्य श्री उभाडे सर, पिंपळी हायस्कूल चे मुख्याध्यापक विकास शेलकर सर ,सकाळ चे ज्येष्ठ पत्रकार पी एन पाटील सर ,ईश्वर महाजन सर यांनी आपल्या मनोगत सांगितले की सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री एस.एच. पाटील यांचा शाळा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य अनुभवतांना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एक आदर्श शिक्षक व प्रशासक म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे. शाळेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंत असंख्य पैलूंवर त्यांनी त्यांची परिपूर्णता दाखवली आहे.
श्री पाटील सरांनी विद्यार्थ्यांना नेहमी केंद्रबिंदू मानून शिक्षक म्हणून प्रेरणादायी भूमिकेत काम केले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्साहाचा वातावरण निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करीत राहिले.
अनेक आव्हानांना सामोरे जातांना ते नेहमी शांत आणि संयमी राहिले, जे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतिक होते. त्यांनी विज्ञान शिक्षक म्हणून आपले ज्ञान उंचावले तरी गणित विषय शिकवण्याचे आव्हान त्यांनी संकल्पबद्धतेने स्वीकारले. ३३ वर्षे त्यांनी गणित सोप्या पद्धतीने शिकवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड वाढली. हेच शिक्षकत्वाचे खरे रूप असते, जे विद्या प्रसारासाठी समर्पित असते.
त्यांच्या अतूट प्रयत्नांमुळे त्यांच्या मुलगा रोहीत व मुलगी स्नेहल आय आय टी बंग्लोरला
प्रतिष्ठित संस्थांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत. या यशात त्यांच्या पत्नीची व परीवाराची नियमित आणि खंबीर साथ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. एक कुटुंब म्हणून त्यांनी एकमेकांना मदत केली आणि एकत्रितपणे यशस्वी जीवन घडवले.
श्री एस.एच. पाटील यांचे हे कार्य अनेकांनी आदर आणि कृतज्ञतेने टिपले आहेत. त्यांचा अनुभव, मेहनत, आणि समर्पण अनेकांसाठी प्रेरणा आहे. आगामी काळातही अशा उत्तम शिक्षकांचा संगोपन होतो याची इच्छा व्यक्त करतो. त्यांच्या उदात्त कार्यासाठी आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
शिक्षण क्षेत्रात अशा व्यक्तिमत्वांची नेहमीच गरज असते, जे विद्यान्ना नवी दिशा देतात आणि आपल्या मुलभूत जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडतात. श्री एस.एच. पाटील सर यांची ही निष्ठा आणि समर्पण सदैव आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते असे सांगितले..
तर दोन्ही मुले व पुतनी यांनी सराबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना भावनिक झाले.. त्यांनी सांगितले की माझे वडील आमचे आदर्श आहेत.त्यांनी परीवाराची उत्कृष्ट काळजी घेत योग्य मार्गदर्शन केले असे सांगितले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच.पाटील यांनी बोलतांना सांगितले की माझ्या कार्यकाळात मला संस्थेचे अध्यक्ष ,संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, शिक्षक बंधू ,मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले त्यामुळे मी काम करू शकलो.. माझ्या कार्याचा आज सर्वांनी गुणगौरव केला.. कार्यक्रमाला आले त्याबद्दल सर्वांचे त्यांनी धन्यवाद व्यक्त केले..
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पाटील यांचा शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सहपत्नीक सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा मुख्याध्यापक ठाकरे म्हणाले की सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो.. तुमच्या उत्तम कर्मामुळे लोकं कायमचं तुमचा परिचय देत राहतील असे सांगत सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच पाटील यांच्या कार्याचा गौरव करत सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या..
यावेळी अतिथी श्री डी एन पाटील,मा. मुख्याध्यापक,श्री गोसावी एन डी सुरेंद्र सुर्यवंशी श्री खैरनार सर ,मा. उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी सरपंच राजेंद्र,कांतीलाल पाटील,महेंद्र पाटील
नावरी गावाचे मा. सरपंच अशोक आबा ,सरपंच सुरेश पाटील, नवल नगर येथील माजी सरपंच अमृत पाटील उपस्थित होते
पिंपळी येथील माजी मुख्याध्यापक जे पी पवार सर , प्रमोद पवार , जे.डी.सी..सी बँकेचे वरीष्ठ लिपिक विजय सिसोदे सह इतर मान्यवर,सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू ग्रामस्थ उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवरे सर यांनी केले.

3
1085 views