logo

अज्ञात वाहनधारकांनी वेकोली कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटले.

Aima Media news chandrapur

राजुरा:- वेकोली बल्लारपूर क्षेत्रांतर्गत गोवरी पवनी खदान मध्ये काम करणारे कर्मचारी रविवारी सकाळी ड्युटीवर जात असताना अचानक ६ अज्ञात मुखवटाधारकांनी त्यांना मोटारसायकलवरून २५ फूट दूर झुडपात ओढून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचे दोन्ही हात व पाय मोडले.

हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी वेकोली कर्मचारी शंकर पाचभाई यांचा मोबाईल फोन आणि त्यांच्या खिशातील पैसे काढून तीन मोटारसायकलवरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या वेकोली कामगाराला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजुरा पोलिसांनी आरोपी यश जिवतोडे सह ५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

गोवरी पवनी विस्तार खाणीत चालक म्हणून कार्यरत असलेले शंकर पाचभाई (५९) हे आज सकाळी त्यांच्या दुचाकी क्रं एमएच ३४ एएन ३७९९ ने सकाळी ८.१५ वाजता जात असताना सास्ती खाण आणि गोवरी कॉलनी दरम्यानच्या वळणावर आला असता, टॉवेलने तोंड झाकलेल्या ६ अज्ञात तरुणांनी त्याला अडवले, मारहाण करून २५ फूट दूर झुडपात ओढून नेले आणि लोखंडी पाइपने बेदम मारहाण केली. रस्त्यावरील दुचाकी व आवाज ऐकून इतर कामगार जमा झाले असता ६ मुखवटाधारी युवक शंकरला बेशुद्ध अवस्थेत सोडून ३ दुचाकीवरून पळून गेले.

कामगारांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता शंकर पाचभाई यांचे दोन्ही हात व पाय फ्रॅक्चर झाले असून ते बेशुद्ध पडले आहेत. स्थानिक अधिकारी व राजुरा पोलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे राजुराचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, हवालदार नूतनकुमार डोर्लीकर, हवालदार गुंडेराव पोले, संतोष पोले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

दरम्यान, शंकरला सास्ती ओपनकास्ट माईनच्या रुग्णवाहिकेने क्षेत्रीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, श्वानपथकही दाखल, चंद्रपूर फिंगरप्रिंट अधिकारीही दाखल.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक लोखंडी पाईप, एक रुमाल, रक्ताने माखलेली माती आणि बोटांचे ठसे घेतले गेले. राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३१०(२), ११८(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केले असता रामपूर येथून यश जीवतोडे सह ५ जणांना ताब्यात घेतले. शेतीच्या वादातून नातेवाईक यश जीवतोडे यांनी आपल्या सहकारी समवेत मारहाण केले.

पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशन चे प्रभारी आयपीएस अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करत आहेत

6
654 views