logo

जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा याच्या कडून,पत्रकारांची काळजी !!..


मन्सूर शहा चिखली:---, 26 जानेवारी रोजी पोलिस परेड मैदानावर पत्रकारांची दुर्व्यवस्थेचा मुद्दा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने उचलला होता. जिल्हा पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली होती. दोन दिवसांनंतर 1 मे ला महाराष्ट्र दिन आहे. पोलिस परेड मैदानावर शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात पत्रकारांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ग्राउंडवर बोलावून घेतले. इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी ध्वजस्तंभसमोर शूटिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. तसेच इतर पत्रकारांसाठी शेडमध्ये आसन व्यवस्था राखीव करण्याचे निर्देशही माननीय एसपी महोदयांनी अधीनस्थ अधिकाऱ्यांना दिले. पत्रकारांसाठी घेतलेल्या या काळजीबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, कार्याध्यक्ष वसीम शेख, महासचिव कासीम शेख, सचिव शिवा मामनकर, विभागीय संघटक रहमत अली तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव आदींनी जिल्हा पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.

6
2301 views