
गंगापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयात सेवा हक्क दिवसाची शपथ
गंगापूर प्रतिनिधी : २८ एप्रिल हा शासकीय सेवा हक्क
दिवस असल्याने गंगापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शकतेची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत
शासनाच्या सेवा पारदर्शक पध्दतीने विहीत कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपुर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबध्द राहुन सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन. मी उक्त कायद्याने नागरिकांना प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून व नागरिकांविषयी सेवा भाव ठेवून कल्याणार्थ काम करेन. भाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करणार असल्याची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी मुख्यालय सहाय्यक आप्पासाहेब टोंपे, साधना लोखंडे, दिपक पल्हाळ, कीशोर डाके, शुभम वैष्णव, संजय नागरे, सुरेश हारणे, विनोद दलाल, प्रभाकर सानप आदी उपस्थित होते.