logo

लोकशाही पत्रकार संघातर्फे पुण्यात कार्यकारणी बैठक संपन्न..

आज पुण्यातील असणाऱ्या सर्किट हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात घेण्यात आलेल्या लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्य कारिणीत पुणे जिल्ह्यातील सक्रिय पत्रकार संजय बाबा सरोदे यांची निवड उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी निवडीचे प्रमाणपत्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्रताप वसंतराव साळुंखे पाटील, संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य साहेब, प्रदेश उपाध्यक्षा सौ. हलीमाताई शेख, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग साळुंखे तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या बैठकीत संघटना पूढे कशी आणता येईल, संघटनेचे कार्य किंवा स्वरूप नक्की काय असणार, लोकशाही पत्रकार संघातील सभासद यांना या व्यवसायाचे स्वरूप, तसेच या संघटनेमार्फत महिलांना रोजगार निर्मिती, असे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले. सोबत मान्यवर महिला आघाडी सौ. श्रद्धाजी कंडुंडे, नाशिक विभाग अध्यक्ष श्री. धर्मेंद्र कदम महिला आघाडी अध्यक्षा सौ. जयश्री बसते बीड तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची व नेते मंडळींची उपस्थिती लाभली...

29
2709 views