
खरसुंडीत खिलावरी जनावरांच्या यात्रेत सात कोटीची उलाढाल
कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या संयुक्त विद्यमानाने खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवांची खिल्लारी जनावरांची यात्रा दिनांक 21/4/2025 ते 26/4/2025 घाणंद चिंचाळे रस्त्यावर भरवण्यात आली यात्रेमध्ये बाराहाजार जनावरांची आवक झाली होती त्यामध्ये जनावरांच्या यात्रेमध्ये खरेदी-विक्री सहित सात कोटीची उलाढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पैलवान संतोष पुजारी यांनी दिली आणि यात्रेमध्ये बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी व्यापारी व जनावरांसाठी पिण्याच्या पाणी टँकरद्वारे स्वच्छ व मुबलक पाण्याची सोय करण्यात आली व रात्री उशिरा यात्रेकरूंसाठी व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लाईटची सोय करण्यात आली तसेच चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे चे सोय करण्यात आली आणि पार्किंगसाठी व उपबाजारासाठी ही सोय करून घेण्यात आली जनावरांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक प्रत्येक ठिकाणी सोय करून देण्यात आली यात्रा कालावधीमध्ये बाजार समिती उपसभापती सुनील सरक संचालक सुबराव पाटील भगवान पाटील शंकर पिसे यांनी वेळोवेळी भेट देऊन दिलेल्या सुविधा बाबत माहिती घेतली पुरेशा सुविधा दिल्यामुळे शेतकरी व्यापारी व दलाल यांनी समाधान व्यक्त केले तसेच ग्रामपंचायत सरपंच धोंडीराम इंगवले यांनी यात्रेमध्ये पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून दिले ग्रामपंचायत चिंचाळे सरपंच संजय कदम व माजी सरपंच गजानन गायकवाड यांनी सुद्धा यात्रेमध्ये पिण्याचे पाणी करून सहकार्य केले खरसुंडी व चिंचाळे येथील ग्रामस्थ यांची यात्रा कालावधीमध्ये बाजार समितीस मोलाचे सहकार्य लाभले मोठ्या प्रमाणात जनावरांचा मोठा बाजार भरून ही इतरांच्या सहकार्याने यात्रा स्थळावर सर्व सुविधा उपलब्ध करून करून यात्रा सुव्यवस्थेत सुरळीत पार पडल्या