logo

माहूर आगाराने केली माहूर ते गंगापूर बस सेवा सुरु

गंगापूर । माहूर आगाराने माहूरगड ते गंगापूर अशा दोन बसेस सुरु केलेल्या असून २९ पासून या बसेस सुरु करण्यात आलेल्या आहे. नांदेड विभागातील माहुर आगारास नवीन BVI बसेस प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार माहुर आगाराने माहुर ते गंगापूर बस पुसद, कळमनुरी, हिंगोली, औढा, जिंतूर, मंठा, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे सुरु केली आहे. पहिली माहुर बस माहूर येथून सकाळी ६:३०

व दूसरी बस सकाळी ९:३०

वाजता निघून वरील मार्गे सायंकाळी ५:०० वाजता व
दुसरी ८:०० वाजता गंगापूर मुक्कामी पोहचेल. परतीच्या प्रवासात पहिली बस गंगापूर

येथून सकाळी ५:०० वाजता

व दूसरी बस सकाळी ८:०० वाजता निघेल. माहुर आगाराने सुरु केलेल्या या बसेसचा गंगापूर तालुक्यातील व परिसरातील प्रवाश्यांना देवी रेणुकामाता, माहूरगड येथे दर्शनास जाण्यास लाभ होणार आहे.

अशी माहिती गंगापूर आगारप्रमुख विजय बोरसे, सहाय्यक वाहतुक अधिकारी भापकर, बागुल, श्रीमती जगरवाल यांनी दिली आहे.

5
479 views