logo

लेहा गावात पीर ख्वाजा गरीब नवाज बाबांचा संदल शांतीपूर्वक साजरा

जालना जिल्ह्यातील लेहा गावात पारध पोलीस स्टेशन नेतृत्वाखाली संदल व कव्वालीचा कार्यक्रम शांतीपूर्वक पार पाडण्यात आले आहे पीर ख्वाजा गरीब नवाज बाबांचा बुधवारी रात्री मोठ्या थाटामाटाने बाबांचा संदल सगळीकडून आलेले भक्त श्रद्धालो व समस्त गावकऱ्यांनी मिळून साजरा केला आहे या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने याही वर्षी सर्व समाज व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन पीर ख्वाजा गरीब नवाज बाबांचा रात्री संदल शांतीपूर्वक साजरा केला आहे आपल्या भारत देशामध्ये अशाच प्रेमाने सर्व जाती व धर्माचे लोकांनी एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून देशांमध्ये भाईचारा सुख शांती कायम ठेवण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे या गावातील नागरिकांनी समस्त भारत देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती व धर्माच्या नागरिकांना हे प्रेमाचे भाईचार्‍याचे संदेश दिले आहे ( जय हिंद जय भारत) प्रतिनिधी.शेलुद अमीर शाह संपर्क 9527121728

83
2795 views