logo

वाठवडा येथील ग्रामस्थाकडुन महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


जिल्हा प्रतिनिधी (विकास वाघ धाराशिव) कळंब तालुक्यातील वाठवडा येथील सोमनाथ भाऊ टिंगरे यांच्या संकल्पनेतून पाचवी वर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा व मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून तसेच एक पॅड व पेन देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेतील प्राथमिक पदवीधर ज्येष्ठ शिक्षक कडके सर यांनी शिष्यवृत्ती पात्र मुलांना पुस्तक भेट दिले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष दिलीप राऊत. अशोक इरपतगिरे. ग्रामपंचायत सदस्य कचरू नवगिरे. प्रमोद पवार. जयपाल राऊत. भरत पुंड. अजमेर पठाण. विजय शितोळे. सुमित राऊत विलास साळुंखे. स्वप्निल पुंड. रंजीत टेकाळे. कुशल साळुंखे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पवार समस्त गावकरी व शिक्षण प्रेमी नागरिक तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी निवृत्त शिक्षक दिलीप राऊत यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे भरभरून कौतुक केले.
शिष्यवृत्ती परीक्षा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी.
१ . समृद्धी नेमिनाथ टेकाळे
२. आस्था नितीन टेकाळे
३. इंद्रजीत श्रीराम कोकाटे
४. गार्गी प्रदीप इरपतगिरे
मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यादी
१. श्लोक सुभाष कोकाटे पहिली
२. प्रगती राजेंद्र कोकाटे विभागात प्रथम क्रमांक दुसरी.
३. समीक्षा अंकुश कोकाटे. दुसरी .केंद्रात प्रथम क्रमांक
४. प्रांजल किरण कुंभार. तिसरी वर्गातून केंद्रात पहिला क्रमांक
५. योगिनी शरद पवार. तिसरी वर्गातून केंद्रात द्वितीय क्रमांक
६. आदित्य मनोज येवतकर तिसरी वर्गातून केंद्रात तृतीय क्रमांक
७. श्रेया धनंजय कुंभार चौथी वर्गातून केंद्रात तृतीय क्रमांक
८. श्रावणी राजेंद्र कोकाटे २५० गुण
९. समृद्धी नेमिनाथ टेकाळे पाचवी वर्गातून केंद्रात प्रथम क्रमांक
१०. आस्था नितीन टेकाळे पाचवी वर्गातून केंद्रात द्वितीय क्रमांक
११. राधिका तानाजी राऊत सहावी वर्गातून केंद्रात द्वितीय क्रमांक
१२. कोमल अमोल राऊत, रिद्धी रमेश राऊत. इयत्ता सहावी वर्गातून केंद्रात द्वितीय क्रमांक
१३. सिद्धेश धर्मराज टेकाळे इयत्ता सातवी वर्गात उत्तीर्ण.
१४.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडके सर यांनी केले. मुख्याध्यापक शामंते सर यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांचे हार्दिक आभार मानले. शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

23
4372 views