logo

30 एप्रिलच्या रात्री यवतमाळात  "बत्ती गुल" आंदोलन यशस्वी



वक्फ अमेंडमेंट कायदेविरोधात 30 एप्रिलच्या रात्री 15 मिनिटांसाठी झाला शांतीपूर्ण ब्लॅक आउट

यवतमाळ:- केंद्र सरकारने वक्फसाठी असलेल्या संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करून बनविलेल्या वक्फ अमेंडमेंट कायदा 2025 पूर्णतः रद्द करावा, या मागणीसाठी संपूर्ण देशात ऑल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाच्या वतीने 30 एप्रिलच्या रात्री पुकारलेल्या बत्तीगुल आंदोलनाला  यवतमाळ शहरात मुस्लिम नागरिक आणि सामाजिक संघटनांचा व्यापक प्रतिसाद मिळाला.वक्फ अमेंडमेंट कायदा 2025 रद्द करावा यासाठी AIMPLB (ऑल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) द्वारे सध्या देशात विरोध प्रदर्शन आणि जनजागरण मोहीम सुरू आहे.याच अनुषंगाने बुधवार 30 एप्रिल 2015 रोजी रात्री यवतमाळ शहर व जिल्ह्यात सर्व तालुक्यात मुस्लिम समाजाच्या वतीने वक्फ सुधारणा कायदा 2925 विरोधात "बत्ती गुल" आंदोलन पुकारण्यात आले होते. "वक्फसाठी 15 मिनिटे बत्तीगुल करून- एक मूक भूमिका", ' एक आवाज, एक चळवळ - बत्ती गुल'असे आव्हान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हे बत्ती गुल आंदोलन करण्यात आले.या दरम्यान मुस्लिम नागरिकांनी आपल्या घर,दुकाने,कार्यालये,कारखाने आणि सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांची 15 मिनिटांसाठी लाईट ऑफ करून या कायद्याचा निषेध नोंदवून आपला रोष प्रकट केला.या दरम्यान सर्व मुस्लिम बहुल भागात नागरिकांनी AIMPLB च्या आव्हानांवर स्वयंस्फूर्तीने रात्री 9 वाजता 15 मिनिटांसाठी बत्तीगुल करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सरकारने मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकाराविरुद्ध लादलेल्या  वक्फ अमेंडमेंट कायदा 2025 चा विरोध करून याला तात्काळ रद्द करा अशी भावना या बत्तीगुल आंदोलनाच्या माध्यमाने प्रकट करण्यात आली.

दरम्यान 30 एप्रिलच्या रात्री बत्तीगुल आंदोलनादरम्यान शहरातील कळंब चौक येथे रात्री झालेल्या वक्फ अमेंडमेंट कायदा निषेध सभा आयोजित झाली,यात AIMPLB यवतमाळ वर्किंग कमिटी सदस्य,कुल जमात विफाक, औकाफ बचाव दीन बचाव समिती,मराठा सेवा संघाचे पदाधिकारी,दलित सामाजिक संघटना, तेली समाज संघटनेचे पदाधिकारी आणि मुस्लिम युवक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले.येथे उपस्थितांना AIMPLB चे यवतमाळ वर्किंग कमिटीचे मुफ्ती शारीक, प्रा.प्रवीण देशमुख यांनी संबोधित केले.यावेळी बोलताना मुफ्ती शारीक म्हणाले की,केंद्र सरकारचा मुस्लिमांनी मशिदी, खानकाह,मदरसे, दरगाह साठी दान (वक्फ) केलेल्या संपत्ती हडपून पूंजीपतींना देण्यासाठी वक्फ सुधारणा कायदाच्या नावाने हा डाव रचण्यात आला आहे. मुस्लिम समुदायाला असलेल्या संवैधानिक अधिकारांचा उल्लंघन करून मुस्लिम समुदायाने दान दिलेल्या वक्फ संपत्तीवर सरकारने आपला सरकारी अतिक्रमण करण्याच्या आणि हडपण्याच्या इराद्याने असंवैधानिक पद्धतीने हा वक्फ सुधारणा कायद्या लागू केला आहे असे ते म्हणाले.या वक्फ सुधारणा कायद्याला देशातील संपूर्ण मुस्लिम समुदायाचा विरोध असून जो पर्यंत सरकार हा कायदा रद्द करीत नाही,तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील असा इशारा या बत्तीगुल आंदोलन दरम्यान मुस्लिम समुदायाकडून सरकारला देण्यात आला. तर यावेळी प्रा.प्रवीण देशमुख यांनी देशात सरकार द्वारे प्रायोजित मुस्लिम, शोषित पीडित वंचित वर्गावर सतत होणारे अत्याचार आणि अन्यायाचा खरपूस समाचार घेताना असंवैधानिक पद्धतीने बनविलेल्या आणि मुस्लिम समाजाच्या वक्फ संबंधी संवैधानिक धार्मिक अधिकारांवर घाला घालून सरकारने हा जो अन्यायकारक वक्फ अमेंडमेंट कायदा पारित केला आहे तो तात्काळ रद्द करण्याची मागणी आपल्या संबोधांतून केली.हा आंदोलन यशस्वी करण्यासाठी AIMPLB जिला सदर मुफ्ती इनाम यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ AIMPLB चे स्थानिक एक्शन समितीचे मौलवी शारीक़ साहब, हाफिज शेर खान,हाफ़िज़ अनीस, मुफ्ती सोहेल,शकील अहमद खिजर,जिया मीनाई,डॉ.शेख मुजीब, ॲड.इम्रान देशमुख, खलील अहमद, प्रा.साजिद सलीम,मुश्ताक गौरी, अली इमरान,साजिद पटेल,शकील अहमद, निजाम काजी, सय्यद शहाबुद्दीन यांच्यासह कुल जमात विफाक, औकाफ बचाओ दीन बचाओ समिती आणि मुस्लिम समाजाच्या असंख्य युवकांकडून परिश्रम करण्यात आल.

1
615 views