logo

मदर डेअरी नंतर आता अमूलने केली दूधाच्या किंमतीत वाढ.?

अमूलने केली दूधाच्या किंमतीत वाढ.?

ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री.

मदर डेअरीनंतर आता अमूलने देखील दुधाच्या दरामध्ये वाढ केली आहे. मदर डेअरीने बुधवारी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ ३० एप्रिल २०२५ पासून लागू झाली असून आता १ मे च्या मुहूर्तावर अमूल कंपनीनेही नंबर लावला आहे. अमूलने आपल्या दुधाचे दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवले आहेत. ही दर वाढ उद्यापासून सर्वत्र लागू होणार आहे.

मदर डेअरीने शेतकऱ्यांचा विचार करत म्हणाले. ग्राहकांना चांगले आणि ताजे दूध उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचीही काळजी घेत आहे. नवी किंमत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि खर्चाचा वाढता भार थोडासा संतुलित करता यावा यासाठी दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मदर डेअरीने आपल्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये मदर डेअरीच्या दुधाचे दर ५४ रुपये प्रति लिटरवरून ५६ रुपयांवर पोहोचले आहेत.तर फुल क्रीम दुधाचे दर ६८ रुपये प्रति लिटरवरून ६९ रुपये प्रति लिटर झाले आहेत. यासोबतच टोंड दूध पाउचची किंमत ५६ रुपये प्रति लिटरवरून ५७ रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. तर डबल टोंड दूधाची किंमत ४९ रुपये प्रति लिटर वरून ५१ रुपयांवर पोहोचली आहे. तर गायीच्या दुधाची किंमत प्रति लिटर ५७ रुपयांवरून ५९ रुपयांवर पोहोचली आहे.

116
11369 views