रावेरला भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी
येथे भगवान परशुराम यांची जयंती निमित्त शोभायात्रा काढून आणि प्रवचनाचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील बाविसे गल्लीत भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन बाविसा ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष सुधाकर वैद्य व मान्यवरांनी केले. यानंतर तेथूनच येथील श्रीराम भजनी मंडळाच्या टाळ आणि चिपळ्यांच्या गजरात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. चिन्मय मुकेश दुबे या बालकाने केलेल्या भगवान परशुराम यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री विष्णू के छठे अवतार, भगवान परशुराम की जयजयकार! भगवान परशुराम की जयच्या घोषात शोभायात्रा वाणी गल्ली, डॉ. हेडगेवार चौक, मेन रोड, महाराजा अग्रसेन चौक, मोठे दत्त मंदिर मार्गे, पाराचा गणपती व तेथून परत बाविसे गल्लीत परत आली.
उपस्थित ब्रह्मवृंद, युवक आणि महिलांनी श्री रामरक्षा स्तोत्रचे सामूहिक पठण केले. आरती होऊन भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
परिसरातील सर्व समाज बंधू भगिनींची उपस्थिती हे शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. सर्वजण आपल्या पारंपारिक वेशात आले होते.
शोभायात्रेत हभप,ज्योतिषाचार्य व भागवताचार्य विशाल शास्त्री गुरुबा, जळगाव, नारायण शास्त्री दुबे, हभप कांतिलाल महाराज, केंद्रीय कार्यकारणी सदस्य दिलीप वैद्य, पुष्कराज मिसर, विलास विखे, डॉ. राजेंद्र आठवले, राजेश पांडे, गोपाल दुबे, प्रदीप मिसर, प्रभूदत्त मिसर, श्याम दूबे, पवन वैद्य, कपिल दुबे, राजेंद्र उपाध्ये, प्रकाश दुबे, राजेंद्र मेहता, गणेश दूबे, अनंत दुबे, भूपेंद्र मिसर, धीरज मिसर, अमोल पाठक, नरेश मिसर, देवेंद्र पाठक, चंद्रेश दुबे, केदार दुबे, प्रणव दुबे, मुकेश दुबे,राजेंद्र दुबे,धोंडू वाणी, युवराज नेमाडे, रमेश खडायते, गोपाल पटेल,प्रसाद मिसर,गौरव चंदवानी, हर्षल सावदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
रामस्वामी मठात प्रवचन
समस्त ब्रह्मवृंद’ संस्थेतर्फे येथील रामस्वामी मठात हभप गुरुबा यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी शहर आणि परिसरातील विविध मंदिरातील पुजाऱ्यांचा रुमाल टोपी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. समस्त ब्रह्मवृंदचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी, माजी अध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती होती. विशाल शास्त्री गुरुबा यांचे प्रवचन झाले. सचिव उदय पाठक यांनी सूत्रसंचालन केले. कपिल महाराज यांनी आभार मानले.