logo

साहेबराव सवाईराम राठोड पोलीस उप-निरीक्षक यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न.

यवतमाळ:- दिनांक 1/5/2025 रोजी जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांच्या वतीने श्री. साहेबराव सवाईराम राठोड सर पोलीस उप-निरीक्षक यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ कार्यक्रम प्रेरणा हॉल, पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथे संपन्न झाला. कार्यक्रमचे अध्यक्ष PI मा.श्री.ज्ञानोबा देवकते सर, प्रमुख पाहुणे श्री. साहेबराव सवाईराम राठोड सर पोलीस उप-निरीक्षक, श्रीमती. जयश्री साहेबराव राठोड, आदित्य साहेबराव राठोड, प्रणव साहेबराव राठोड,मा.श्री.यशपाल पाली सर, मा.श्री.साबळे सर,मा.श्री. लुकमान सर, मा.श्री.जहीरुददीन‌ काझी ,मा.श्री.वाहेद शेख, जिवणे सर,पाली सर महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख, पोलीस बाॅईज शैलेश नगराळे, जितेंद्र बोराडे,रियाज शेख,शारिक शेख, वाहतूक शाखा यवतमाळ सर्व कर्मचारी , यवतमाळकर सर्वांच्या उपस्थित महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने आदरणीय श्री. साहेबराव सवाईराम राठोड सर पोलीस उप-निरीक्षक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.

*अष्टपैलू व्यक्तिमत्व*
पोलीस विभागातील जवळपास ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरून नियत वयोमानानुसार *साहेबराव राठोड* आज सेवानिवृत्त होत आहे.
अत्यंत उमदे आणि तंदुरुस्त व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष व निष्कलंक कर्मचारी तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असे व्यक्तिमत्व म्हणजे साहेबराव राठोड.
पोलीस विभागातील पूर्ण सेवा यवतमाळ शहरातच पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा वाहतूक शाखा यामध्ये त्यांनी पूर्ण केली.
खेळाडू म्हणून आपल्या संघाचा आधारस्तंभ म्हणून साहेबराव यांनी ख्याती प्राप्त केली होती. पोलीस विभागातर्फे खेळताना राज्य स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात त्यांनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदके प्राप्त केली व राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले. व्हॉलीबॉलच्या राज्य पोलीस संघात तीन वेळा अखिल भारतीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले.
मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी मलेशिया, ब्राझील, श्रीलंका व थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक या क्रीडा प्रकारात आणि सांघिक खेळात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, हँडबॉल, टेनिस हॉलीबॉल यामध्ये साहेबराव यांनी अनेक पदके प्राप्त केली आहेत.
पोलीस विभागातील त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील यशाची दखल घेऊन राज्य पोलीस विभागाने
पोलीस महासंचालक पदक
व केंद्राच्या राष्ट्रपती पदकाने
साहेबराव यांना सन्मानित केले आहे.
आपले काम व क्रीडांगणावरील यश यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस विभागालाच नव्हे तर राज्य पोलीस विभागाला सुद्धा सन्मान प्राप्त करून दिला आहे.
पोलीस विभागासोबतच क्रीडा क्षेत्राचा मोठा आधारस्तंभ असणारे साहेबराव यांचा मोठा मित्रपरिवार सर्वच क्षेत्रात आहे. सेवानिवृत्तीनंतरही साहेबराव अधिक हिरीहिरीने क्रीडा व सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहतील याबद्दल खात्री आहे.
सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायी व आरोग्यदायी राहो यासाठी अनंत मंगलमय शुभकामना देण्यात आले.

1
1298 views