जिल्हा नंदुरबार दि. 02/05/2025 आमदार राजेश पाडवी यांनी काश्मीर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय"
कृपया प्रसिद्धीसाठी"आमदार राजेश पाडवी यांनी काश्मीर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय"पाच मे 2025 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या स्तरावर समाज उपयोगी व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला जात असतो. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक शुभचिंतक मला भेटायला माझ्या सोमावल या गावी येत असतात.मात्र अगदी काही दिवसापूर्वीच काश्मीर पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 हुन अधिक भारतीय नागरिकांची हिंदू म्हणून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ ला , संतापाची लाट आहे. अशा या परिस्थितीत संपूर्ण देश या घटनेने दुखी असून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करायचं नाही असा मी निर्णय घेतलाय. कृपया माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक व शुभचिंतक यांनी नोंद घ्यावी.-आमदार राजेश पाडवी, वि. स. स