
सावनेर आगार डेपोसाठी 5 नवीन बसेस मंजूर
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
सावनेर:
मिळालेल्या माहितीनुसार :
• लोकार्पण सोहळा संपन्न.
• माझी माऊली फाउंडेशनतर्फे पाण्याच्या प्याऊचे उद्घाटन.
सावनेर बस डेपोसाठी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 5 नवीन बसेस मंजूर झालेल्या आहेत. दिनांक 02 मे 2025 ला सावनेर येथे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. सर्वप्रथम वैष्णवी ताई भगत, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी मान्यवरांच्या हस्ते नवीन बसेसचे पूजन करण्यात आले. त्यांनतर मान्यवारांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या शासकीय दौऱ्यांमध्ये अनेक गावातील लोकांनी, विद्यार्थ्यांनी बसेसची मागणी केली होती. बसेस कमी असल्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. सदर विषयाचा पाठपुरावा आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी शासनदरबारी लावून तसेच विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र परिवहन विभागामार्फत 5 नवीन बसेस मंजूर करून घेतल्या. त्यामुळे विद्यार्थी व सामान्य लोकांना प्रवासाकरिता दिलासा मिळाला आहे. पुन्हा एकदा आमदार डॉ देशमुख यांनी आपल्या कामाच्या धडाक्यातून दमदार कामगिरी सिद्ध केली आहे.
याप्रसंगी डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या माझी माऊली फाउंडेशनतर्फे प्रवाशांकरिता पाण्याच्या प्याऊचे उद्घाटन करण्यात आले.
सदर लोकार्पण सोहळ्यात मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, महेश चकोले, मंदार मंगळे, मंगेश कोठाडे, नितीन कमाले, दिगंबर सुरतकर, पियुष बुरडे प्रफुल मोहटे, सोनू नवदिगे उपस्थित होते.