logo

विवाह नोंदणी आता सतरा मजलीत



जळगाव :

विवाहाची नोंदणी करण्यासाठी नवरदेव, नवरीला आता फिरफिर करावी लागणार नाही. पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नानीबाई रुग्णालयातील विवाह नोंदणी कार्यालय आता महापालिकेच्या सतरा मजली इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी घेतला आहे. तिसऱ्या मजल्यावरील जन्म-मृत्यू विभागाला लागूनच हे कार्यालय सुरू केले जाणार आहे.

सध्या पंचमुखी हनुमान

मंदिराजवळील मनपाच्या नानीबाई रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू आहे. हे कार्यालय नागरिकांना सापडत नाही. शिवाय त्या ठिकाणी लोक जात नसल्याने हे कार्यालय आता मनपाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे.

33
1319 views