logo

*कामगार दिनानिमित्त मित्रांनी एकत्र येऊन दिला जून्या आठवणींना नवा उजाळा!*


नाशिक - नेहरूनगर वसाहतीतील प्रेस कामगारांच्या मुलांनी १मे २०२५ रोजी,कामगार दिनाचे औचित्य साधून."माझं नेहरू नगर" ह्या माध्यमातून स्नेह मेळाव्याचे आयोजन केले.स्नेह संमेलनास सर्व नेहरू नगर मधील ३५ ते ४० वर्षा पुर्वीच्या सवंगड्यांनी हजेरी लावून आपल्या सवंगड्याची गळा भेट घेतली
आणि जुन्या आठवणींना नवा उजाळा दिला.या कार्यक्रमात अनेक मित्रांनी आपा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाप्रसंगी अस्मिता संतोष गाडेकर, हिने सौतन पिश्चर मधील जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पडेगा.हे गीत गाऊन मान्यवर व उपस्थितांचे मने जिंकली.ह्या कार्यक्रमात समितीने डीजे कराओके व संबळ देखील ठेवले होते.संबळच्या ठेक्यावर सर्व मित्रांनी नाचण्याचा आनंद घेतला.मित्रांच्या आग्रहाखातर दिपक शेजवळ यांनी संबळ वाजवुन सर्व मित्रांना नाचवले.
या कार्यक्रमास.कोअर कमिटी नितीन चंद्रमोरे.मनोहर (मनुभाऊ) गायकवाड.दिपक शेजवळ.दत्ता दंडगव्हाळ.सिकंदर तडवी.उदय(बबलु)भालेराव.
निखिलेश शिंदे.गौतमभाऊ पगारे.बाळासाहेब गायधनी.अन्वर तडवी.अनिल साळवे.सुरेश निकम.राजेश ढगे.विजय भिसे.युवराज जाधव.राजु वाघ.गेले दिड महीन्या च्या परिश्रमातून सर्व जुन्या सवंगड्यांच्या भेटी घडवून आणल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहरू नगर वसाहतीला जत्रेच स्वरूप प्राप्त झाले होते.
खूप सारी जुनी मित्र मंडळी भेटली. एकमेकांना आलिंगन दिली गेली.प्रेमाच्या आकाभाका झाल्या
प्रेमाच्या बागा फुलल्या होत्या आठवणींना महापूर आला होता.जुन्या आठवणींना आलेली अवकळा पुन्हा एकदा जागरूक होऊन पाण्याचे नितळ झरे वाहताना दिसत होते.
आई वडिलांनी केलेल्या कष्टाची याद येत होती. त्यांच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते.गरीबीत गेलेले बालपण आज मनाच्या श्रीमंतीत येताना दिसत होते.लहानपणी नेहरू नगर वसाहतीच्या फुललेल्या बागा पुन्हा एकदा मेळाव्याच्या निमित्ताने फुलल्या होत्या.
कार्यक्रमासाठी एवढी भावंडे जमा होतील हे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
मेळाव्यासाठी मित्र परिवारांचे थवेच्या थवे येत होते. हे वातावरण बघुन डोळ्यातुन आनंदाने गंगा यमुना वहात होत्या.या कार्यक्रमाच्याप्रसंगी
नाशिकरोड जेलरोड येथील रहिवासी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक पत्रकार कवी: रत्नदीप जाधव (राजरत्न)यांनी
मित्रांच्या जून्या आठवणींवर

*🤔कसं लहान व्हायाचं?👶*

घालमेल झाली माझी
घालमेल झाली |
कोरस:घालमेल झाली माझी घालमेल झाली १
लहानपणाची मला
आठवण आली |
कोरस:-लहानपणाची आठवण आली १
मला खेळायला जायाचं‌
कसं लहान व्हायाचं ||धृ||
कोरस:-मला खेळायला जायाचं
कसं लहान व्हायाचं? २

रमलो जिथे आम्ही बालपणात
कोरस:-रमलो जिथे आम्ही बालपणात १
आठवणी येती वृध्दपणात |
कोरस:-आठवणी येतात वृध्दपणात..१
साठवण आठवणींची मनात
लहान व्हावे‌ वाटे क्षणात |
स्वप्न डोळ्यात पाहयाचं
कसं लहान व्हायाचं...|१|
कोरस :-मला खेळायला जायाचं‌ २
कसं लहान व्हायाचं....?

नेहरू नगरच्या मैदानात
कोरस:-नेहरू नगरच्या मैदानात १
खेळायचो क्रिकेट मित्र उन्हात |
कोरस:-खेळायचो क्रिकेट मित्र उन्हात
जवळच होता वेल्फेअर हाँल २
दडी मारायचो दाबून लग्नात |
मग पाटात पोहयाचं
कसं लहान व्हायाचं |२|
कोरस:-मला खेळायला जायाचं‌
कसं लहान व्हायाचं ?

गण्या मन्या दिप्या विज्या मकरंद
कोरस:-गण्या मन्या दिप्या विज्या मकरंद१
अतरंगी मित्र आम्ही बेबंद |
कोरस:-अतरंगी मित्र आम्ही बेबंद |
कला गुणांचा आम्हाला छंद २
भेळभत्ता खाण्यात मिळे आनंद |
पुन्हा एकत्र यायाचं
कसं लहान व्हायाचं |३|
कोरस:-मला खेळायला जायाचं
कसं लहान व्हायाचं....?

"राजरत्न" खेळून आम्ही दमायचो
प्रेमानंद दोंदेंच्या घरी जमायचो |
कोरस:-प्रेमानंद दोंदेंच्या घरी जमायचो |
गाण्याच्या मैफलीत रमायचो २
कला गुणात आम्ही रंगुनी जायचो |
गाणं सुरात गायाचं
कसं लहान व्हायाचं |४|
कोरस:-मला खेळायला जायाचं
कसं लहान व्हायाचं...?
हे गीतही लिहिले होते.

64
8581 views