वर्धा: पथक धडकले आणि बालविवाह थांबविला
वर्धा: आर्वी तालुक्यातील खरांगणा पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह रोखण्यात आला. अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतात बालसंरक्षण कक्षाने विवाह रोखला. माहिती मिळताच बाल संरक्षण पथकाने बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार विवाह थांबविण्याची कार्यवाही केली. बालविवाह वर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्देश दिले होते. चाइल्ड लाईन व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे कर्मचारी आणि कार्यकर्ते मुलीच्या घरी पोहोचले. मुलीला माहिती विचारली. कागदपत्रे तपासली असता मुलगी 17 वर्षे 1 महिन्याची आहे असे आढळून आले.