logo

पुण्यात अल्पवईन बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत राऊंड हस्तगत......

पुणे: दिनांक २९/०४/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फतीने कात्रजकडून मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवून थांबला आहे अशी बातमी मिळाली. लागलीच नमुद पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर जावून पाहता तेथे एक विधीसंघर्षीत बालक, वथ १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आल्याने त्याचेकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहरं, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे

12
1245 views