logo

कल्याण हादरले! महिलेने १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपविले; सीसीटीव्हीत कैद झाली घटना, नेमकं काय घडलं? Crime News

कल्याण हादरले! महिलेने १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपविले; सीसीटीव्हीत कैद झाली घटना, नेमकं काय घडलं?
Crime News: शनिवारी दुपारी एका महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारली होती. नंतर माहिती घेतली असता, ती अनोळखी महिला होती. ती बाहेरून आली होती. ती येथील रहिवासी नाही, अशी माहिती योगिधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली.कल्याणमधील योगीधाम परिसरातील एका प्रमुख गेटेड कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका अज्ञात महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही महिला लिफ्टने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

0
0 views