एक पोलीस कर्मचारी निलंबित, दोन पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यालयांमध्ये तडका फडकी बदली.
देवळी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई किरण आडे यांना पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले तर दोन पोलीस कर्मचारी किशोर साखरे,विनोद चौधरी, यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार देवळी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई किरण आडे बक्कल नंबर (८६०)
यांना ठाणेदारासोबत असभ्यवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे कळते तसेच तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरही गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयातून पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केल्याचे कळते.
परंतु गावामध्ये अवैध वाळू तस्कर अवैध दारू विक्रेते यांच्या सोबत देवाणघेवाणीचा विषय करून वर माहिती दिलेली नाही त्यामुळे हा सर्व प्रकार देवळी पोलीस स्टेशन मध्ये घडल्याचे अवैध व्यवसाय करणारे तसेच देवळी शहरामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.