logo

भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती किती वाढली हे तपासणार.....


पुणे :

आमच्या सरकारच्या काळामध्ये मोजणीसाठी, मुद्रांक नोंदणीसाठी पैसे घेणे, हे चालू दिले जाणार नाही. राज्यात अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ज्यांना सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो शोधत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांची नोकरीवर असताना संपत्ती किती होती आणि आता किती आहे, याचीही तपासणी करण्यात येणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बावनकुळे म्हणाले, जमाबंदी आयुक्त कार्यालयात ५ ते २० वर्षांपासून

काही भ्रष्टाचारी लोक बसले. त्यांना शोधू, अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासारखा भ्रष्टाचाराच्या आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही शोधून काढणार आहे. त्यांना निलंबित करण्यात आले, पुढील कालावधीत त्यांना बडतर्फदेखील

करण्याची कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांवर हल्ला मान्य नाही

पुरंदर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल. विमानतळाचे डिझाइन पाहिल्यावर ते झालेच पाहिजे, असे पत्रकारच सांगतील. मी भूसंपादनमंत्री आहे. ज्यांचे काही प्रश्न असतील, त्यांनी मला सांगावे. जमिनीचे दर वाढवून पाहिजे तर देऊ. शेतकऱ्यावर लाठीहल्ला करणे, त्यांचा जीव जाणे मला मान्य नाही, असे मह‌सूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

23
501 views