उष्माघाताला घाबरू नका मात्र दक्ष रहा-सुरक्षित रहा-डॉ.हसराज वैद्य
नांदेड, दि. ५ : सूर्य नारायण रोजच्या रोज प्रखरतेने आग ओकत आहेत. आता ऊन्हाचा पारा 45 अंश डिग्रीच्याही पुढे पुढे जात आहे. कांंही दिवसात उष्णतेचा उच्चांक अर्थात पन्नाशी पार होण्याचीच चिन्हे दिसत आहेत. आपणच याला सर्वस्वी जबाबदार आहोत हे उघड सत्य आहे!
विकास व प्रगतीच्या नावाखाली आपण सर्रास वृक्षतोड केली व करत आहोत. म्हणून आता तरी आपण दक्ष तथा सतर्क होऊ या. वृक्षतोड थांबवू या व घरातील व्यक्तीगणिक प्रत्येकाचा वाढदिवस फक्त "एक कडूनिंबोनीच्या(कडू लिंब) वृक्षाचे रोपण करून साजरा करू या व त्याचे संवर्धन" जबाबदारीने करूया.
प्रचंड तपमान वाढीमुळे अर्थात प्रखर उन्हामुळे प्रामुख्याने ऊन लागणें तथा उन्हाचा चटका लागणें व ऊष्माघात होणें हे सामान्य पणे प्रादूर्भाव होतात.
विशेषत्वेकरून 1) ज्येष्ठ तथा साठ वर्षावरिल वृद्ध, 2)गरोदर माता,3)लहान बालके, 4)उन्हात उघड्यावर काम करणारे व्यक्ती, 5)आग्नी प्रज्वलित करणाऱ्या बंद कारखाण्यात काम करणारे कामगार, 6)लोहार,घीसडी, शिक्कलकरी 7)विट भट्टीवर काम करणारे कामगार 8)शेतीवर काम करणारे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अंग मेहनत करणारे गामगार 9) उन्हात कार्यरत ट्रॅफिक पोलीसा सम कर्मचारी वृंद 10)रोग प्रतिकार शक्ती कमी झालेले तथा रोग प्रतिकार शक्तीशी तडजोड करणारे जूनाट, दीर्घ आणि जिर्ण आजार पिडीत रूग्णांदिना सतर्क होण्याची गरज आहे. अति प्रखर ऊन्हाचे तथा अति उष्ण तपमानाचे मानवीय शरिरावर होणारे जिव घेणे दोन प्रकारचे दुष्परिणाम तथा प्रादूर्भाव आपण सतर्कतेने सहज टाळू शकतो.
उन्ह लागणे - शक्य तो सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडे पाच वाजे पर्यंत घरा बाहेर पडूच नका. हा सर्वांना सर्वतोपरी,साधा, सोपा, अखर्चिक सर्वोत्तम मार्ग आहे. घराबाहेर जाणे अनिवार्यच असल्यास तथा अनिवार्यच झाल्यास खबरदारी घ्या. तहान नसली तरी थोड्या थोड्या वेळाने साधे का होईना पाणी सतत पित रहा!अनवाणी पायानी फिरू नका.वहान (चप्पल,सैंडल, बूट,जोडा,स्लिपर कांही तरी) पायात घालूनच घराबाहेर पडा. अंगात पांढर्याच रंगाचे, अंग भरून खादिचे तथा सूती, शैल(ढिले-डगळे) कपडे परिधान करा (घाला-वापरा). रस्त्याच्या बाजूच्या वृक्षाच्या छाये-छायेतून (सावली-सावलीने),थांबत थांबत प्रवास करा. डोक्यावर टोपी,पागोटे,उपरणे, पदर,ओढणी व डोळ्यावर उन्हाळी चष्मा(गॉगल्स) वापरणे शक्य झाल्यास उत्तम.वापरा. जेवनात शक्य झाल्यास भरपूर पाणीयुक्त फळें (टरबूज,खरबूज, काकडी, कांदा,कंद इ.),फळांचा रस,शरबत,ऊसाचा रस, दही, ताक,मठ्ठा भरपूर प्रमाणात घ्या.
उन्हाचा तथा प्रखर तपमानाचा प्रादूर्भाव झालाच व शरिराचे तपमान वाजवी पेक्षा जास्त वाढले,ताप भरला,घसा कोरडा पडला,डोळे जळ जळ करू लागले,लघ्वी कमी होवू लागली,लघ्वीला त्रास होऊ लागला,डोके दूखणें, चक्कर येणें,भोवळ येणें, डोळ्याला आंधारी येणें,भ्रांत जाणें,अशी लक्षने दिसल्यास तथा आढळून आल्यास घाबरून जाऊ नका. तात्काळ वैद्यकीय तज्ञाचा सल्ला व उपचार घेण्याने अपत्ती टाळू शकतो! अनर्थ आपण टळतो. असा सल्ला डॉ.हंसराज वैद्य यांनी दिला आहे.